आता विद्यार्थ्यांनाही मिळणार विमा संरक्षण - विनोद तावडे

आई वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे मुलाचं शिक्षण थांबू नये, यासाठी दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 14, 2018 11:36 AM IST

आता विद्यार्थ्यांनाही मिळणार विमा संरक्षण - विनोद तावडे

कोल्हापूर, 14 मे : आई वडिलांच्या अपघाती मृत्यूमुळे मुलाचं शिक्षण थांबू नये, यासाठी दोन कोटी विद्यार्थ्यांचा विमा उतरवणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीय. या विम्याचे संरक्षण विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही दिले जाईल, असंही तावडेंनी स्पष्ट केलं.

गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. दै.'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तावडे यांनी 'पुढारी' दैनिकाच्या सामाजिक तसेच स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचाही आढावा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2018 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...