भीक नाही तर जनतेने जिव्हाळ्याने मदत केली, तावडेंचं खासदार संभाजी राजेंना उत्तर

'सामान्य माणसांनी पुरग्रस्तांना मदत केली याचं संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवं होतं. पण त्याची राजेंनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते.'

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 05:35 PM IST

भीक नाही तर जनतेने जिव्हाळ्याने मदत केली, तावडेंचं खासदार संभाजी राजेंना उत्तर

मुंबई 20 ऑगस्ट : कोल्हापूरमधल्या पुरग्रस्तांसाठी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरिवतील रस्त्यावर फेरी काढून मदत मागीतली. त्यांचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आणि खासदार संभाजी राजे  यांनी त्यावर सडकून टीका केली होती. कोल्हापूरकरांना भीकेची गरज नाही. आम्ही स्वाभीमानी आहोत. ही पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा आहे अशी टीका त्यांनी ट्विटकरून  केली होती. विनोद तावडे यांना ही टीका चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यांनी एक निवेदन काढून खासदार संभाजी राजे यांना चांगलच उत्तर दिलंय. ही भीक नव्हे तर सामान्य जनतेने जिव्हाळ्याने मदत केली  याचं संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवं होतं. पण त्याची राजेंनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते असंही तावडे यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलंय विनोद तावडेंनी?

बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे.

'वंचित' मधल्या मुसलमानांना बोलण्याची मोकळीक - प्रकाश आंबेडकर

या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि... म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते.

Loading...

गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले १०-१० रुपये मिळून ३.५० लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले २४.५० लाख रुपये, अशी एकूण २८ लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हां सर्वांना माहीत आहे.

EDच्या नोटीसवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे.

आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 05:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...