अंबाबाईच्या मूर्तीची झीज झालीच नाही -विनोद तावडे

अंबाबाईच्या मूर्तीची झीज झालीच नाही -विनोद तावडे

पुजारी हटाव संघर्ष समितीने कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन तावडे यांच्या या उत्तराचा निषेध केलाय

  • Share this:

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

27 जुलै : कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्तीची झीज झाल्याचं आणि त्याला जबाबदार पुजारी असल्याचा आरोप होत असताना संस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मात्र मूर्तीची झीज झालीच नसल्याचा खुलासा सभागृहात केलाय.

शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांच्या प्रश्नावर तावडे यांनी दिलेले हे उत्तर धादांत खोटे यांनी माहिती न घेता दिले असल्याची टीका आता होऊ लागली आहे.

पुजारी हटाव संघर्ष समितीने कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन तावडे यांच्या या उत्तराचा निषेध केलाय. देवस्थान समितीच्या सदस्यांनीही या पत्रकार परिषदेला उपस्थिती लावत देवस्थान समितीकडून माहिती न घेताच तावडे यांनी सभागृहाची फसवणूक केल्याचा आरोप केलाय.

केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालात मूर्तीची झीज झाल्याचं स्पष्ट असताना चुकीची माहिती दिल्याबद्दल विनोद तावडे यांनी आठ दिवसात माफी मागावी अन्यथा त्यांचे कोल्हापूर बंद ठेऊन स्वागत करू असा इशारा पुजारी हटाव समितीने केलाय तर अंबाबाई मूर्तीच्या विषयी कोणत्याही प्रश्नावर माहिती घेऊनच बोलावे अशी मागणी देवस्थान समितीच्या सदस्यांनी केलीये.

First published: July 27, 2017, 9:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading