मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भाजप जिंकणार हे आधीच माहीत होतं म्हणून पवारांनी माघार घेतली'

'भाजप जिंकणार हे आधीच माहीत होतं म्हणून पवारांनी माघार घेतली'

'विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावं लागेल', अशा प्रकारचं वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत.

'विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावं लागेल', अशा प्रकारचं वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत.

'विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावं लागेल', अशा प्रकारचं वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत.

मुंबई, 10 एप्रिल : 'घटनेचे कलम 370  आणि कलम 35 ए बाबत तुमची भूमिका स्पष्ट करा. कारण कलम 370 जर तसाच ठेवला तर कश्मीर प्रश्न तसाच राहतो, पण जर कलम 370 काढला तर काश्मीर प्रश्न आपोआप सुटण्यास मदत होते. दहशतवादी पाकिस्तानलाही हे कलम ठेवले पाहीजे असं वाटतं. त्यामुळे यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे', असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला आहे.

'विरोधकांनी एकत्र येऊन जे काही तोडकं-मोडकं महागठबंधन तयार केलं आहे. त्यामुळे त्यांनीही यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी' असं विनोत तावडे म्हणाले आहेत. बरं इतकंच नाही तर 'महागठबंधन हे तोडकं-मोडकं आहे असं माझं नाही तर सिताराम येचुरी यांचं म्हणणं आहे.' असंही तावडे म्हणाले.

'सिताराम येचुरी म्हणतात की... '

'विरोधक देशभरात एकत्र नाहीत, पण निवडणुकानंतर मात्र आपल्याला एकत्र यावे लागेल. निवडणुकीनंतर एकत्र येऊन भाजपशी लढावं लागेल', अशा प्रकारचं वक्तव्य सिताराम येचुरी करत आहेत. याचा अर्थ भाजप सत्तेत येईल आणि आपण विरोधात बसू असं येचुरी बोलत आहेत. हे शरद पवारांना आधीच कळलं होतं. म्हणून ते निवडणूक लढले नाहीत' असंही तावडे यांनी सांगितलं.

हेही वाचा : प्रकाश आंबेडकरांना मोठा झटका, वंचित बहुजन आघाडीत फूट!

'निवडणुकीमध्ये पैसे हे काँग्रेसचं मुख्य हत्यार आहे. परंतू सध्या त्यांचे पैसे अडकले असल्यामुळे काँग्रेस अस्वस्थ असावी', असं मत व्यक्त करताना तावडे म्हणाले की, 'निवडणुकांच्या काळातील काँग्रेसच्या हालचालींची माहीती आयटीला कळल्यामुळे त्यांच्या विरुध्द कारवाई करण्यात आली असेल. निवडणूक आयोगानेही यामध्ये सरकारचा हात नसल्याचं स्पष्ट केलं. जर आयटीमध्ये काही चुकीचं नसेल तर मग घाबरण्याचं काही कारणच नाही', असं तावडे यांनी स्पष्ट केलं.

ज्यावेळी एनडीएची स्थापना झाली. त्यावेळी एनडीएमध्ये विविध पक्ष होते. त्यावेळी एनडीएमध्ये असणाऱ्या फारुक अब्दुला यांनी भाजप आणि अन्य मित्र पक्षाचा मिनिमम प्रोग्रॅम मान्य केला होता. यावरही तावडेंनी टीका केली आहे. 'शरद पवार यांना आता गांधी कुटुंबाचे बलिदान आणि त्याग दिसत आहे, पण त्यांनी जेव्हा 2 वेळा काँग्रेस सोडली तेव्हा ते काँग्रेसबद्दल काय बोलले होते ते अद्याप जनता विसरलेली नाही. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएमध्ये असलेल्या फारुक अब्दुलांची भूमिका तुम्हाला आज आठवत असेल तर काँग्रेस सोडताना तुम्ही काँग्रेसवर केलेली टिकाही तुम्हाला आठवायला हवी.'

ते पुढे म्हणाले की, 'फारुक अब्दुला आता एनडीएमध्ये नाहीत, त्यामुळे त्यांची भूमिका ही सध्याची आहे. ज्याप्रमाणे तुमची भूमिका बदलली त्याचप्रमाणे त्यांचीही भूमिका बदलली असावी', असेही त्यांनी सांगितलं. खार इथे मंगळवारी निवडणूक आयोगाने टाकलेल्या छाप्याचा भाजपाशी काहीही संबध नाही, हे आमचं प्रचारसाहित्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

VIDEO : जळगावात मारहाण झालेल्या भाजपच्या माजी आमदाराची पहिली प्रतिक्रिया

First published:

Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, Sharad pawar, Vinod tawade