अखेर विनोद तावडे नरमले, फी वाढ करणाऱ्या शाळांविरोधात केले 3 निर्णय जाहीर

अखेर विनोद तावडे नरमले, फी वाढ करणाऱ्या शाळांविरोधात केले 3 निर्णय जाहीर

सुनावणी नंतर दोषी आढळणाऱ्या शाळांची एनओसी रद्द करणे,मान्यता रद्द करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत तावडे यांनी दिले.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे

12 मे : पुण्यातील 18 मुजोर शाळांच्या मुजोरी विरोधात आंदोलन करणाऱ्या पालकांना अखेर यश मिळालं. 18 पैकी 7 शाळांची फी वाढ आणि गणवेश,पुस्तकं-वह्या विक्रीतील मनमानी याबाबत सोमवार आणि मंगळवारी पुण्यात सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीला शिक्षणमंत्री विनोद तावडे स्वतः हजर असतील. संबंधीत शाळांचे प्रतिनिधी,पालक,शिक्षण विभागाचे अधिकारी ही सुनावणीत सहभागी होतील.

या शाळांनी 15 टक्के पेक्षा जास्त फी वाढ केलीय जी नियमबाह्य आहे. शिक्षण शुल्क समितीने निश्चित केलेल्या रक्कमेक्षा जादा आहे तसेच पुस्तकं वह्या गणवेश या शालेय वस्तू शाळेतून किंवा विशिष्ट दुकानातून खरेदी करून या शाळा नफेखोरी करतात असा पालकांचा आरोप आहे.

परवा आणि आज 2 वेळा पालकांनी पुण्यात कार्यक्रमाना आलेल्या विनोद तावडे यांना घेराव घातला आणि प्रश्नांची सरबत्ती केली. अखेर तावडेंनी बैठक घेऊन पालकांशी चर्चा केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तावडे यांनी 3 महत्वाचे निर्णय जाहीर केले.

1) 18 शाळांची सुनावणी घेणार,पहिल्या टप्प्यात 7 शाळांची सुनावणी

2) शालेय वस्तूंच्या सक्तीच्या खरेदी विरोधात ग्राहक न्यायालयात दाद मागणार

3) शुल्क नियंत्रण कायदा अधिक कडक करण्यासाठी समिती नेमणार. या समितीत 5 पालकांचा समावेश करणार.

सुनावणी नंतर दोषी आढळणाऱ्या शाळांची एनओसी रद्द करणे,मान्यता रद्द करणे अशा स्वरूपाची कारवाई करण्याचे संकेत तावडे यांनी दिले.

First published: May 12, 2017, 5:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading