मराठा आणि ओबीसी समाजाच्या मुद्यावर विनायक मेटेंचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

मराठा आणि ओबीसी समाजाच्या मुद्यावर विनायक मेटेंचा सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

'राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध 7 नोव्हेंबरला मशाल मार्च काढण्यात येणार आहे.'

  • Share this:

बीड, 31 ऑक्टोबर : 'सरकारला मराठा आरक्षणाचा (maratha reservation) प्रश्न ओबीसी (obc) आणि मराठा समाजात चिघळत ठेवायचा आहे. दोन्ही समाजात भांडणे लावायची आहेत', असा गंभीर आरोप विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केला आहे.तसंच, 'मराठा उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण (ashok chavan)यांना बाजूला करा', अशी मागणीही मेटे यांनी केली आहे.

बीडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना विनायक मेटे यांनी राज्य सरकार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली.

'मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारच्या उदासीन धोरणा मुळे महाराष्ट्र बचबच माजली आहे. नोकर भरती, मेघा भरती रखडली आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या हलगर्जीपणाच्या धोरणाविरुद्ध 7 नोव्हेंबरला  मशाल मार्च काढण्यात येणार आहे. तो बांद्रा येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' पर्यंत हा मशाल मार्च काढण्यात येणार आहे, असं विनायक मेटे यांनी सांगितले.

'शिवाजी महाराजांच्या वंशजांनी इतर समाजासाठी सुद्धा काम करावे'

मंत्रिमंडळातील सदस्य बेजबाबदारपणे बोलत आहेत, मराठा उपसमितीची अध्यक्ष अशोक चव्हाण हलगर्जीपणाने वागत आहेत. त्यामुळे चव्हाणांना पदावरून हटवून योग्य व्यक्तीची निवड या पदावर करण्यात यावी, समाजाला न्याय देण्यासाठी योग्य धोरण आखावे यासाठी हा मशाल मार्च निघणार आहे. असे मेटे म्हणाले.

ओबीसी समाजाच्या नेत्यांचा मराठा समाजाच्या नेत्यांना इशारा

दरम्यान, 'मराठा समाजाच्या नेत्यांनी सरकारकडे काही ही मागणी केली तर सरकार लगेच त्यांना प्रतिसाद देते. राज्य सरकार जर मराठा समाजाला आमच्यापेक्षा वेगळं 13 टक्के आरक्षण देणार असेल तर त्याला आमची हरकत नाही. पण जर ओबीसी आरक्षणाला हात लावला तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

अजब आहे राव! जीव वाचवण्यासाठी म्हशीचं मुंडण, नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

तसंच, 'मराठा राजकीय पुढाऱ्यांमुळेच मराठा समाज मागासला आहे. मराठा समाज म्हणतो आरक्षण  मिळालं नाही तर तलवारी उपसू, जर असं असेल तर आम्ही सुद्धा ढाल समोर करू. ओबीसी समाजाने ठरवलं तर मुंबई बंद पडू शकते. मराठा समाजाच्या नेत्यांनी ओबीसी समाजाला डिवचू नये, त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल, अशा इशारा ओबीसी समाजाचे नेते दामोदर तांडेल यांनी दिला.

Published by: sachin Salve
First published: October 31, 2020, 2:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या