भाजपची डोकेदुखी वाढणार, मित्रपक्षही साथ सोडणार?

भाजपची डोकेदुखी वाढणार, मित्रपक्षही साथ सोडणार?

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे

  • Share this:

किशोर गोमासे, प्रतिनिधी वाशिम, 15 डिसेंबर : भाजपला आधीच पक्षांतर्गत नाराजांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत. त्यात आता भाजपचे काही मित्रपक्षाची नाराज असल्याचं कळतंय. वाशिम जिल्हा परिषदेसह इतर निवडणुकीत शिवसंग्रामनं वेगळी भूमिका घेण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपला त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाशिम येथे शिवसंग्राम पक्षाच्या  कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी विनायक मेटे आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणूक शिवसंग्रामाच्या चिन्हावर लढवणार असल्याचं सांगितलंय.

भाजपसोबत नाराज नाही पण काही विषय असल्याचं भेटून मांडणार असल्याचं, विनायक मेटे यांनी सांगितलंय. त्यामुळं आता विनायक मेटेंचा नाराजीचा सूर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाशिममधील शिवसंग्राम कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

शिवसंग्राम पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे. मात्र, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसंच वाशिमसह पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका शिवसंग्रामच्या चिन्हावर लढणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.

भाजपातील स्वपक्षीयांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं आता आता विनायक मेटे यांनी नाराज असल्याचे संकेत दिले आहे. विनायक मेटे यांनी वेगळी भूमिका घेतल्यास वाशिम जिल्ह्यातील जिल्हापरिषद निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान,  भाजपने सर्वांसाठी न्याय भूमिका ठेवली. भाजप पक्षाने कुणावरही अन्याय केला नाही. एखाद्याला वाटत असेल की अन्याय झाला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल भाजपने कोणत्याही समाजावर अन्याय केला, नसल्याचंही मेटे म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 15, 2019, 7:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading