मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak mete : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश VIDEO

Vinayak mete : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस' विनायक मेटेंच्या आईंचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश VIDEO

 देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली'

बीड, 14 ऑगस्ट : 'देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका.., आता काय करू' असा म्हणत विनायक मेटे (Vinayak mete) यांच्या आईंनी आक्रोश केला. मेटेंच्या आईंचा आक्रोश पाहून उपस्थितींच्या डोळ्यात पाणी आलं. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे यांचं अपघाती निधनामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बीडच्या तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या घरी त्यांच्या आईंना आणण्यात आले त्यावेळी आईंनी एकच आक्रोश केला. देवा, तू मला का घेऊन गेला नाहीस. मला सरणात उडी घेऊन द्या. मला अन्न पाणी देवू नका..काय माझ्या बाबाने लोक जमवली, घरी 15-17 लोक आली तर कधी हाडतूड केली नाय... कुणाला आम्ही जाऊ नका म्हणालो नाय' असं म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी तिथे उपस्थितीत असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. तसंच, विनायक मेटे जसे समाजकारणात सक्रिय होते, अगदी तसेच ते नाते सांभाळण्याचा देखील प्रयत्न करत होते. मेटे साहेबांनी मला वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी मला वडिलांचं प्रेम दिलं, त्यामुळं मला सासर आहे असं कधीचं वाटलं नाही. असं म्हणत विनायक मेटे यांच्या भावजई वैशाली मेटे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आठवण सांगितली. तर आमदार विनायक मेटे हे माझे मामा होते, त्यांनी माझ्यासह माझ्या भाऊ आणि बहिणीला वडीलांसारखं सांभाळलं आहे. अगदी मुलगी जशी वडिलांकडे हट्ट करते तसाच हट्ट मी देखील करत होते. असं म्हणत आमदार विनायक मेटे यांच्या भाच्ची कल्पना वळेकर यांनी भावना व्यक्त करत आठवण सांगितली.
First published:

पुढील बातम्या