मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेवटचे शब्दही मराठा आरक्षणासाठीच; विनायक मेटे यांच्या शेवटच्या भाषणाचा Video

शेवटचे शब्दही मराठा आरक्षणासाठीच; विनायक मेटे यांच्या शेवटच्या भाषणाचा Video

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता.

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता.

Vinayak Mete : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं. त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता.

  • Published by:  Rahul Punde
बीड, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेक नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत मेटे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. मेटे यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम हा बीड तालुक्यात होता. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी येथे संत ह.भ.प.वै.किसन बाबा यांच्या 24 व्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.शांतिब्रम्ह नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प.संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याची कीर्तनाने झाली.  यावेळी मेटे उपस्थित होते. शेवटच्या भाषणातून जनेताल दिला होता शब्द या अखंड हरिनाम सप्ताह सांगतेवेळी जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती. या किर्तनानंतर विनायक मेटे यांनी तेथील जनसमुदायशी संवाद साधला. पुढच्या वर्षी 25 ते 30 हजार भाविक बसू शकतील असा सभामंडप बांधू असा शब्द त्यांनी यावेळेस त्यांनी दिला होता. आपल्या छोट्याखानी भाषणात त्यांनी सर्व उपस्थितांना खळखळून हसवलं. त्यांची भाषण शैली अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळाली. विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाक्यावरचा Video समोर, अनेक गोष्टींचा होणार उलगडा अपघातापूर्वी काय-काय घडलं? मेटे यांनी बीड शहरातल्या शिवसंग्राम भवनमध्ये काल सकाळी 11 वाजता तिरंगा रॅली संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दुपारी एक वाजता त्यांच्या मूळ गावी राजेगावला गावाकडे जाऊन घरी भेट दिली. राजेगाव केजला आल्यानंतर केजमध्ये चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. केज होऊन अंबाजोगाईला गेल्यानंतर अंबाजोगाईमध्ये कार्यकर्त्यासोबत 6 वाजता रेस्ट हाऊसला बैठक घेतली. कालचे रात्रीचे जेवण नऊ वाजता अंबाजोगाईच्या रेस्ट हाऊस वर केले. त्यानंतर अकरा वाजता बीडला पोहोचले आणि त्यानंतर पुढे आजच्या होणाऱ्या मुंबईच्या मीटिंगसाठी निघाले. विनायक मेटे त्यांची आज अकरा वाजता बीड शहरामध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र, अचानक मुंबईमध्ये आज मराठा आरक्षणासाठी बैठक लावल्याने ते मुंबईला गेले. मेटे हे कार्यकर्त्यांना सांगून गेले की ते त्या रॅलीला उपस्थित राहू शकत नाहीत. बीड शहरात होणार अंत्यसंस्कार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर बीड शहरावर शोककाळा पसरली आहे. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये रात्री आणले जाईल आणि त्यानंतर बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. उद्या अंतदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणलं जाईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी प्रशासनाकडून अंत्यसंस्कारासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे.
First published:

Tags: Beed, Vinayak mete

पुढील बातम्या