मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Vinayak Mete Death : विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपात?, ट्रक ड्रायव्हरची ओळख पटली, पोलीस गुजरातकडे रवाना

Vinayak Mete Death : विनायक मेटेंचा मृत्यू अपघात का घातपात?, ट्रक ड्रायव्हरची ओळख पटली, पोलीस गुजरातकडे रवाना

Vinayak Mete Accident

Vinayak Mete Accident

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 ऑगस्ट : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Death) यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा मृत्यू झाला आहे. एक्सप्रेस हायवेवर ट्रकने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता, पण आता त्याची ओळख पटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ट्रक बरोबर हा अपघात घडला तो ट्रक पालघर जिल्ह्यातील कासा येथील असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या ट्रकचा नंबर DN 09 P 9404 आहे, तसंच हा ट्रक आयसरचा असल्याचंही समजतंय. ट्रक ड्रायव्हरचं नाव उमेश यादव असल्याचं सांगितलं जात आहे. हा ट्रक ताब्यात घेण्यासाठी पालघर पोलीस गुजरातमधील वापी येथे रवाना झाले आहेत. ट्रकची ओळख पटवण्यासाठी ट्रक मालकाला सोबत घेतलं असल्याचीही माहिती आहे. विनायक मेटेंच्या आईकडून घातपाताचा संशय; तर बैठकीची वेळ कोणी बदलली? मराठा नेत्याचा प्रश्न मेटेंच्या आईकडून घातपाताचा संशय दरम्यान विनायक मेटे यांची आई आणि मराठा आंदोलनाच्या नेत्यांनी मेटे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती, पण मेटेंना मंत्रायलायतून बैठक 12 वाजता होणार असल्याचं सांगण्यात आलं. बैठकीची वेळ का बदलण्यात आली? मंत्रालयातून नेमका फोन कोणी केला? असा संशय मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेनेनंही मेटेंच्या अपघाती मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे. विनायक मेटे यांच्या आईनेही त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. गुणरत्न सदावर्तेंनी काढला पळ; मेटेंच्या अंतिम दर्शनासाठी आल्याने मराठा कार्यकर्ते आक्रमक
First published:

पुढील बातम्या