मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

‘राम मंदिरावरून शरद पवारांनी केला हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान, उद्धव ठाकरे मात्र गप्पच’

‘राम मंदिरावरून शरद पवारांनी केला हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान, उद्धव ठाकरे मात्र गप्पच’

'मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाणार नाही असं पवारांना वाटत असेल तर मंदिर न बांधल्यामुळे कोरोना जाणार का याचं उत्तर पवारांनी द्यावं'

'मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाणार नाही असं पवारांना वाटत असेल तर मंदिर न बांधल्यामुळे कोरोना जाणार का याचं उत्तर पवारांनी द्यावं'

'मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाणार नाही असं पवारांना वाटत असेल तर मंदिर न बांधल्यामुळे कोरोना जाणार का याचं उत्तर पवारांनी द्यावं'

  • Published by:  Ajay Kautikwar

नाशिक 20 जुलै: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामावरून केलेल्या वक्तव्यावर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak mete) यांनी यावरून शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. पवारांनी हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. असं झालेलं असतांनाही कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करतो असं म्हणणारे उद्धव ठाकरे मात्र अजुनही गप्प कसे? असा सवाल मेटे यांनी केला आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला भूमिपूजन होणार आहे. त्यावर प्रतिक्रिया देतांना पवारांनी भाजपला टोला हाणला होता.

देशात कोरोनाचा कहर आहे आणि कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र काही लोकांना मंदिर बांधल्यामुळे कोरोना जातो असं वाटते असं पवारांनी म्हटलं होतं.

त्यावर आता टीकेचे सूर उमटत आहेत. मंदिर बांधल्यामुळे कोरोना जाणार नाही असं पवारांना वाटत असेल तर मंदिर न बांधल्यामुळे कोरोना जाणार का याचं उत्तर पवारांनी द्यावं असंही मेटे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी ‘रामलल्ला’ला देणार खास भेट; करणार राम मंदिराची पायाभरणी

दरम्यान, अयोध्येत श्री राम जन्मभूमीत निर्माण होणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या भूमीपूजन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

161 फुटांच्या मंदिराला असतील 5 घुमट; अयोध्येचं राममंदिर पूर्ण झाल्यावर दिसेल असं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी रामलल्ला मंदिर (Ram Mandir Ayodhya, ) निर्माणाचं भूमीपूजन होणार आहे. या वेळी देशभरातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याचं निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमीपूजन सोहळ्यास हजरे लावतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

First published: