ग्रामपंचायत निवडणुकीवर या 14 गावांचा तिसऱ्यांदा बहिष्कार, मनसे आमदाराचा पाठिंबा

विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी या बहिष्काराला पाठिंबा दर्शवल्याचं समजते.

विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी या बहिष्काराला पाठिंबा दर्शवल्याचं समजते.

  • Share this:
डोंबिवली, 15 डिसेंबर: नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेल्या 14 गावांनी वर्षभरात तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकांवर (Gram Panchayat election) बहिष्कार टाकला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी या गावांनी शासनाकडे वारंवार केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी सलग तिसऱ्यांदा निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी या बहिष्काराला पाठिंबा दर्शवल्याचं समजते. हेही वाचा...मराठा आरक्षणासाठी ओबीसींचं आरक्षण काढणार का? मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या 14 गावांचा प्रश्न काही सुटण्याची नाव घेत नाही आहे. या गावांनी सलग तिसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्काराचे वारे सुरू झाले आहेत. या 14 गावांमध्ये असलेल्या वाकलन, नागाव, दहिसर पिंपरी आणि नारिवली या पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय विकास समितीने जाहीर केला आहे. तर ग्रामस्थांच्या या निर्णयाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. या बैठकीला सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, विजय पाटील, गुरुनाथ पाटील यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोरोनामुळे लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीनंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र, राज्य सरकारने एक महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम होणार आहे. सरपंचपदाची आरक्षण सोडत ही ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पूर्ण केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदाची सोडत ही आधी होत असते. पण यात घोडेबाजार होणार, खोटी जातप्रमाणपत्र दाखवण्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या गोष्टींना आळा घालण्यासाठी जानेवारी महिन्यात सोडत काढण्यात येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे. हेही वाचा..आम्ही हिंदुत्त्व सोडलेलं नाही, उद्धव ठाकरेंनी विरोधकांची बोलती केली बंद राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
Published by:Sandip Parolekar
First published: