मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मरणानंतरही यातना! पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावणारा Video

मरणानंतरही यातना! पुलाअभावी अंत्यसंस्कारासाठी पूरातून नेला मृतदेह, मन हेलावणारा Video

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य समोर आले आहे.

    सोलापूर, 9 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावात पूल नसल्यामुळे पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांना अंतयात्रा काढावी लागली आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या गाजावाजात साजरा होत आहे. विकासाच्या नावाने डंके पिटले जात असतानाच एकीकडे असे उदाहरण समोर आल्याने मरणानंतरही यातना संपल्या नाहीत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाजवळून जाणाऱ्या हरणा नदीतील विदारक दृश्य समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावाची स्मशानभूमी हरणा नदीच्या पलीकडे आहे. मात्र, नदीला पूर आला होता. आणि पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी थेट नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार केला. हरणा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मरणानंतरही खडतर प्रवास करण्याची वेळ आल्याचा प्रकार समोर आला आहे. नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जातानाची मनाला चटका देणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा - 13 वर्षांच्या मुलीच्या पोटात 2 महिन्यांचा गर्भ, डॉक्टरच्या तपासणीमध्ये धक्कादायक प्रकार उघड ग्रामस्थांची मागणी -  दरम्यान, हरणा नदीवर पूल बांधण्यात यावा, यासाठी अनेक वर्षांपासून या पुलासंदर्भात ग्रामस्थांनी मागणी केली आहे. मात्र, तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता मृतदेह पाण्यात घेऊन जाण्याची वेळ आली, त्यामुळे आतातरी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या