Home /News /maharashtra /

...म्हणून गावकऱ्यांचा चढला पारा; सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवून घातला फुलांचा हार

...म्हणून गावकऱ्यांचा चढला पारा; सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवून घातला फुलांचा हार

मोरेवाडीतील नागरिकांनी एका कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून त्याला फुलांचा हार घातला आहे. (फोटो-दिव्य मराठी)

मोरेवाडीतील नागरिकांनी एका कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून त्याला फुलांचा हार घातला आहे. (फोटो-दिव्य मराठी)

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील काही नागरिकांनी एका कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून (put dog on sarpanch's chair) त्याला हार घातला आहे.

    अंबाजोगाई, 13 ऑक्टोबर: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) तालुक्यातील मोरेवाडी (Morewadi) गावात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील काही नागरिकांनी एका कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून (put dog on sarpanch's chair) त्याला हार घातला आहे. तसेच कुत्र्याचा डोक्याला टिळा लावून अनोख्या पद्धतीनं निषेध केला आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सरपंचबाई आपल्या कार्यालयात फिरकल्या नसल्याने गावकऱ्यांनी, सरपंचाच्या कृत्याचा निषेध केला आहे. कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथील महिला सरपंच गेल्या दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून त्यांनी मंगळवारी सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवलं होतं. एवढंच नव्हे तर नागरिकांनी कुत्र्यांला फुलांचा हार घालून टिळा देखील लावला होता. यानंतर संतप्त नागरिकांनी सरपंचबाईंनी ग्रामपंचायतीत हजर राहावं अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन देखील दिलं आहे. हेही वाचा-बदनामी टाळण्यासाठी गॅलरीत लपायला गेली अन्...; इमारतीवरून पडून महिलेचा मृत्यू या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटलं की, मारेवाडीतील महिला सरपंच गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीत आल्या नाहीत. त्या केवळ झेंडावंदन आणि सार्वजनिक उत्सवासाठीच ग्रामपंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामं त्या आपल्या घरातूनच करतात. गावकऱ्यांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात येत नाहीत. तसेच त्यांनी गेल्या काही काळापासून मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हेही वाचा-खोटेपणा उघड झाला अन् बीएमसीतील नोकरी गेली; बुलडाण्यात तरुणानं उचललं टोकाचं पाऊल याबाबत प्रतिक्रिया देताना महिला सरपंचाचे  पती कविराज कचरे म्हणाले की, मोरेवाडी हे गाव महिलांचा सन्मान करणारं गाव आहे. गावातील महिला सरपंचांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून गावातील नागरिकांसाठी सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं काम केलं आहे. गावकऱ्यांनी त्यांच्या या कामाची दखल घेण्याऐवजी, ते निषेध करत आहेत. ग्रामस्थांचं हे कृत्य अशोभनीय आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed

    पुढील बातम्या