अमरावती, 23 ऑक्टोबर : अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांच्यात वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचा काम केलं तर तलवारीने हात छाटल्या शिवाय राहणार नाही, अशी भाषा देवेंद्र भुयार यांनी केली. यावर काँग्रेस पदाधिकारी विक्रम ठाकरे यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर पलटवार केला आहे. दरम्यान हा वाद शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवरून वाढला आहे.
वरूडचे माजी पंचायत समीती सभापती विक्रम ठाकरे म्हणाले की, जागा तुझी, वेळ तुझा सांग मी हजर असेल. अशा भाषेत ठाकरेंनी भुयार यांच्यावर टीका केली आहे. भुयार यांना जशाच तसे उत्तर देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. याचबरोबर आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मागणी करण्यात आली. भुयार यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. विक्रम ठाकरे यांचे काही कार्यकर्त्ये एकत्र येत त्यांच्या निषेध व्यक्त केला.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे येण्याआधीच अब्दुल सत्तार मध्यरात्रीच पोहोचले शेताच्या बांधावर!
दरम्यान त्यांच्यावर आरोपही करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी देवेंद्र भुयार यांनी स्वतः गाडी जाळून स्वतःवर गोळीबार करण्याचा बनावाचा प्रयत्न त्यांनी केला होता. देवेंद्र भुयार यांची कृती गुन्हेगारासारखी आहे. वरुडच्या महात्मा गांधी चौकात या व तुमचा जुना देवेंद्र भुयार दाखवा असं आव्हान काँग्रेस पदाधिकारी विक्रम ठाकरे यांनी भुयार यांना दिलं. यावेळी विक्रम ठाकरे यांच्यासोबत कार्यकर्ते जमले होते. पण, देवेंद्र भुयार आलेच नाहीत.
भुयार काय म्हणाले होते
अमरावतीत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण, तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. हर्षवर्धन दादाच्या नादाला तर बिलकुलचं लागायचं नाही.
हे ही वाचा : काल अमित शहांना शुभेच्छा, आज उद्धव ठाकरेंसोबत नार्वेकर असणार दौऱ्यावर, नाराजीची चर्चा गेली वाहून!
शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला धक्का लावलात तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amravati, NCP, अमरावतीamravati, महाराष्ट्र amravati