विजयसिंह मोहिते पाटलांनी वाढवलं भाजपचं टेन्शन, पुण्यातील कार्यक्रमानंतर म्हणाले...

विजयसिंह मोहिते पाटलांनी वाढवलं भाजपचं टेन्शन, पुण्यातील कार्यक्रमानंतर म्हणाले...

मोहिते पाटील यांना व्यासपीठावर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.

  • Share this:

पुणे, 25 डिसेंबर : लोकसभा निवडणूकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला होऊन भाजपशी जवळीक केल्यानंतर आज पहिल्यांदाच विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत जाहीर व्यासपीठावर पाहायला मिळाले. वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या सर्व साधारण सभेच्या निमित्ताने विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवारांना भेटले. मोहिते पाटील यांना व्यासपीठावर पाहताच शरद पवार यांनीही त्यांना जवळ बसवून घेतलं आणि त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली.

पुण्यातील कार्यक्रमानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपची डोकेदुखी वाढवणारं वक्तव्य केलं आहे. 'मी या आधीही पवार साहेबांना दोन तीन वेळा भेटलो आहे. माझा मुलगा भाजपात गेला आहे. पण मी अजून आहे तिथेच(राष्ट्रवादीतच) आहे,' असं विजयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेला भाजपला जाहीर मदत करणाऱ्या मोहिते पाटील यांनी हे वक्तव्य केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मोहिते पाटील आणि लोकसभा निवडणूक

राष्ट्रवादी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेली माढ्याची जागा जिंकण्यात भाजपला यश आलं. या मतदारसंघात भाजपला मोठा विजय मिळवून देण्यात सर्वाधिक वाटा राहिला तो मोहिते पाटील कुटुंबाचा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरीही या निवडणुकीत त्यांना थेट भाजपला मदत करणारी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.

अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलली आणि सभेत पिकला मोठा हशा

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भाजप उमेदवाराला माळशिरस तालुक्यातून एक लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य देऊ, असा शब्द या निवडणुकीदरम्यान मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा मोहिते पाटील यांचा शब्द खरा ठरल्याचं दिसून आलं. याच तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती.

19 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री राहिलेले 2 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत

मात्र आता राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मोहिते पाटलांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण केला आहे. त्यामुळे आगामी काळात मोहिते पाटील नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2019 05:22 PM IST

ताज्या बातम्या