पश्चिम महाराष्ट्रात पवारांना पुन्हा शह देण्यासाठी फडणवीस खेळणार 'हा' डाव

पश्चिम महाराष्ट्रात पवारांना पुन्हा शह देण्यासाठी फडणवीस खेळणार 'हा' डाव

विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देत भाजपला चांगल्या जागा मिळवून देण्याचं फडणवीस यांचं लक्ष्य आहे.

  • Share this:

मुंबई, 7 जून : लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा मनसुबा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आखण्यात आला. अशातच राष्ट्रवादी आणि भाजपने माढा लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला होता. या मतदारसंघात भाजपला मोठा विजय मिळवून देण्यात सर्वाधिक वाटा राहिला तो मोहिते पाटील कुटुंबाचा.

विधानसभा निवडणुकीतही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का देत भाजपला चांगल्या जागा मिळवून देण्याचं फडणवीस यांचं लक्ष्य आहे. यासाठीच सोलापूरमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना भाजपकडून ताकद देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटलांची भूमिका

विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली नसली तरीही या लोकसभा निवडणुकीत त्यांना थेट भाजपला मदत करणारी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं. माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती.

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने संजयमामा शिंदे यांना आपल्याकडे खेचत मैदानात उतरवले. या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोहिते पाटील घराण्याचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भाजप उमेदवाराला माशशिरस तालुक्यातून एक लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्य देऊ, असा शब्द या निवडणुकीदरम्यान मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता. या निवडणुकीचे निकाल समोर आले तेव्हा मोहिते पाटील यांचा शब्द खरा ठरल्याचं दिसून आलं. याच तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती.

SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

First published: June 7, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading