मुंबई, 29 ऑक्टोबर : शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या 15 नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या निर्णयावर माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या निर्णयावर ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. “केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. असे ट्विट करत माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते, मात्र मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. (1/2)
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 29, 2022
हे ही वाचा : 'खोके देण्या-घेण्याचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून..'; बच्चू कडू अन् रवी राणा वादात एकनाथ खडसेंची उडी
काय म्हणाले वडेट्टीवार
केवळ राजकीय विरोधक म्हणून राज्यातील नवीन सरकारने सुरक्षा कपात करणे योग्य नाही. सरकारमध्ये कोणत्याही पदावर नसलेल्या रवी राणांना सुरक्षा दिली जाते. मात्र, मी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करत असताना सुद्धा सरकारने सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुढे असेही म्हंटले आहे की, सुरक्षा काढल्यामुळे नक्षलग्रस्त भागात मी करत असलेले काम किंवा दौरे कमी होणार नाही. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता.
हे ही वाचा : प्रकल्प गुजरातला का जातात? एकनाथ शिंदे अखेर बोलले, उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला
यांची काढून घेतली सुरक्षा
बाळासाहेब थोरात, वरुण सरदेसाई, धनंजय मुंडे, संजय राऊत, विजय वडेट्टीवार, नवाब मलिक, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, सतेज पाटील, नरहरी झिरवळ, सुनील केदार, डेलकर परिवार, भास्कर जाधव छगन भुजबळ, तर पवार आणि ठाकरे कुटूंबियांची सुरक्षा आहे तशीच आहे. उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Cm eknath shinde, Vijay wadettiwar