• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • 'OBC आरक्षणाची बैठक वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे', वडेट्टीवारांची तिखट टीका

'OBC आरक्षणाची बैठक वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे', वडेट्टीवारांची तिखट टीका

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर 'वांझोटी बैठक' अशी टीका करणाऱ्यांवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे.

  • Share this:
नागपूर, 28 ऑगस्ट: ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा सध्या राज्यातील एक महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. दरम्यान यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवर 'वांझोटी बैठक' अशी टीका करणाऱ्यांवर मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. 'त्या बैठकीला सर्व पक्षीय नेते होते, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका घेऊ नका असे सर्व पक्षांचे म्हणणे होते', असं वडेट्टीवार म्हणाले. बैठकीला वांझोटी बैठक म्हणणाऱ्यांचं तोंडच वांझोटं आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'कायदा आणि सुव्यवस्थेचे काही मुद्दे समोर आले. एकूण आरक्षणामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत, त्यातील 118 जागा जिल्हापरिषदेच्या ओबीसीच्या कमी होतात. परंतू 20 जिल्ह्यात ओबीसीच्या जागा वाढत आहेत. उर्वरित सोळा जिल्ह्यातील गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यातील ओबीसीचं आरक्षण कमी होत आहे. याबाबत सर्व चर्चा झाली. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर law and judiciary चे मत जाणून घेणे आवश्यक आहे. म्हणून पुढील शुक्रवारी या बाबतीत दुसरी बैठक होईल. ती अंतिम बैठक असणार आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाईल.' हे वाचा-नाशिकमध्ये भाजपा-शिवसेना संघर्ष शिगेला, संजय राऊत यांनी घेतली आयुक्तांची भेट ते पुढे म्हणाले की, 'मराठा आरक्षणासंदर्भातही आतापर्यंत दहा बैठका झाल्या आहेत. उलट ओबीसी आरक्षणासाठी दोन-तीनच बैठका झाल्या आहेत. कुणाच्या किती बैठका झाल्या हे महत्त्वाचे नसून आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे.' बावनकुळे यांनी केली होती टीका दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी टीका केली होती की, 'मुख्यमंत्री यांनी बैठका घ्याव्यात, पण ओबीसी आयोगाने मागितलेले मन्युष्यबळ आणि 435 कोटी पहिले द्यावे, जे कालच्या बैठकीत दिले नाही.' मुख्यमंत्री यांनी घेतलेली बैठक ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने वांझोटी बैठक असल्याची टीका त्यांनी केली होती.  वारंवार मागणी करूनही बैठकीत मुख्य सचिवांनी आयोगाच्या मागणीला मंजूरीं दिली नाही, तर डिसेंबरपर्यंत राजकीय आरक्षण मिळू शकणार नाही असेही ते म्हणालेत. त्यांनी अशी टीका केली आहे की, बैठकांवर बैठका घेऊन वेळकाढू पण केला जात आहे पण प्रस्तावाला मजुरी देत नाही.'
Published by:Janhavi Bhatkar
First published: