विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं.

  • Share this:

मुंबई, 24 जून : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. काँग्रेसचा विदर्भातील आक्रमक चेहरा अशी वडेट्टीवार यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या आक्रमकतेचा काँग्रेसला भविष्यात फायदा होऊ शकतो.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. काँग्रेसकडून सुरुवातील या पदासाठी अनेक नेत्यांची नावं चर्चेत होती. यामध्ये बाळासाहेब थोरात यांच्याही नावाचा समावेश होता. आता मात्र काँग्रेसनं वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.

विखेंचा राजीनामा

नगरमध्ये मुलगा सुजय विखे पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळावं, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आग्रही होते. पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने सुजय यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकली नाही. त्यानंतर मग सुजय विखेंनी बंडाचा झेंडा उभारत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

सुजय विखेंनी जरी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी वडील राधाकृष्ण विखेंनी मात्र फक्त विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं. पण काँग्रेसमध्ये राहूनही प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात मात्र त्यांनी नगर आणि शेजारील शिर्डी मतदारसंघातही युतीच्या बाजूनेच आपली ताकद उभी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला.

VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं

First published: June 24, 2019, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading