शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी, फुरसुंगीकर आंदोलनावर ठाम

शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी, फुरसुंगीकर आंदोलनावर ठाम

जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिलेला शब्द फुरसुंगीकरांना मान्य नसल्याचं आज दिसून आलं. मूक आंदोलनाला बसलेल्या फुरसुंगीच्या गावकऱ्यांच्या मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवतारेंना अपयश आले.

  • Share this:

06 मे  : जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिलेला शब्द फुरसुंगीकरांना मान्य नसल्याचं आज दिसून आलं. मूक आंदोलनाला बसलेल्या फुरसुंगीच्या गावकऱ्यांच्या मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवतारेंना अपयश आले.

फुरसुंगीकरांची मनधरणी करून आजपासून पुण्यातला कचरा उचलला जाईल अशी थाटात घोषणा करणाऱ्या मंत्री विजय शिवतारेंना गावकऱ्यांनी दिवसा तारे दाखवले. शिवतारे दुपारी मुक आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांच्या भेटीला आले. पण कदाचित गावकऱ्यांना शिवतारेंशी बोलण्यात काहीच रस नसावा म्हणून त्यांनी तोंडावर काळीपट्टी बांधली आणि शांत रहाणं पसंत केलं.

शिवतारे तासभर बोलत होते पण त्यांच्या शब्दावर गावकऱ्यांना विश्वासच बसत नसावा. त्यांना मधातच थांबवून काही गावकऱ्यांनी सवाल विचारले. काहीही करा, कुठली आश्वासनं नकोतच, हा कचरा डेपो हटवा अशीच मागणी गावकऱ्यांनी केली.

अशा उन्हाच्या पाऱ्यात मंत्री आणि गावकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली त्यावेळेस बैठकीचाही पारा चढला. गावकऱ्यांनी आता स्पष्टपणे शिवतारेंशी नाही तर फक्त मुख्यमंत्र्यांशीच चर्चा होईल अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे शिवतारेंना सध्या तरी अपयश आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2017 12:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading