काँग्रेस-राष्ट्रवादीने 50 चा आकडा पार करुन दाखवावा, गिरीश महाजनांचे आव्हान

काँग्रेस-राष्ट्रवादीने 50 चा आकडा पार करुन दाखवावा, गिरीश महाजनांचे आव्हान

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा. मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय आहे, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

  • Share this:

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)

नाशिक, 14 जुलै- राज्यातील फडणवीस सरकारमधील संकटमोचन अर्थात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला थेट आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा. मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय आहे, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठकीनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना आमच्या शुभेच्छा पण काँग्रेस-राष्ट्रवादीने 288 पैकी 50 चा आकडा पार करुन दाखवावा. मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असे थेट आव्हान दिले. मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय, असेही ते काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्देशून म्हणाले.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते भाजपमध्ये आले. आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे सोडले तर त्यांच्या मागे राहायलाही कोणी तयार नाही. पहिल्या फळीतील पण भाजपमध्ये येण्यास उत्सूक आहेत, असा दावा महाजन यांनी केला. आषाढी एकादशीला जसे वारकऱ्यांचे डोळे विठुरायाकडे लागतात, तसे आता सगळ्यांचे डोळे भाजपकडे लागले आहेत. कारण भाजपशिवाय आता पर्याय नाही, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये- गिरीश महाजन

राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील. सप्टेंबरमध्ये आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे भाकित गिरीश महाजन यांनी वर्तवले आहे. नाशिक येथे रविवारी (14 जुलै) झालेल्या नियोजन बैठकीत गिरीश महाजन यांनी सर्वांचेच लक्ष लागलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात हे भाकित वर्तवले आहे.  गेल्या निवडणुकीच्या तारखेनुसार विधानसभेच्या तारखेचा अंदाज व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीमुळे होऊ न शकलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. 10 किंवा 13 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तसेच 10 किंवा 15 सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले.

यापूर्वी चंद्रकांत पाटलांनी वर्तवले होते भाकित

राज्यात येत्या सप्टेंबरपासून आचारसंहिता लागेल आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील, असे भाकित राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले होते. राज्यात येत्या 15 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होईल. तसेच 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणुका होतील, असे चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर शेरेबाजीही केली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना पराभूत करणे, हे आपले टार्गेट असल्याचे पाटील यांनी म्हटले होते.

VIDEO: '...म्हणून शरद पवारांनी पार्थला बारामतीचं तिकीट दिलं नाही'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 05:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading