SPECIAL REPORT: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

SPECIAL REPORT: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच

ELECTON 2019 विधानसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेनेमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हं

  • Share this:

मुंबई, 11 जून: लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर युतीनं विधानसभेत मिशन 228ची तयारी सुरू केली. त्यात आता पुढचा मुख्यमंत्रीही भाजपचाच असायला हवा असे आदेश भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा एकदा सेना-भाजपात चांगलीच रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

शिवसेना-भाजपमध्ये जरी 50-50 असा फॉर्म्युला ठरला तरी मुख्यमंत्रीपदाबाबत वाद अद्यापही कायम आहे.

सोमवारी (10 जून)अमित शहांनी भाजपच्या सर्व नेत्यांना दिल्लीत बोलावून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्यात पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला पाहिजे, असे स्पष्ट आदेश दिले. सुधीर मुनगंटीवारही जाहीरपणे तेच सांगू लागलेत. पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल असं नाशिकमध्ये बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

भाजपच्या या भूमिकेमुळे सेनेच्या गोटात पुन्हा अस्वस्थता पसरली आहे. कारण जागावाटपाआधीच भाजप मुख्यमंत्रीपदावर हक्क सांगत असेल तर आम्हाला काय? असा सवाल सेनेकडून विचारला जाऊ लागला आहे. अर्थात जाहीर वाद नको म्हणून उद्धव ठाकरे मात्र आमचं ठरलंय, असं सांगत आहेत.

एकूणच शिवसेना-भाजपमधील नेते आमचं ठरलंय हे कितीही सांगत असले तरी दोघांमधील छोटा भाऊ -मोठा भाऊ हा वाद किमान राज्यात तरी कायम आहे.

First published: June 11, 2019, 7:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading