विविके कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 29 जून: पावासाळी अधिवेशनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे विरोधकांच्या निशाण्यावर असल्याचं चित्र आहे. आधी कथित भूखंड घोटाळा आणि आता निवडणूक अचारसंहितेच्या मुद्यावरुन विरोधकांनी चंद्रकांत पाटील यांना चांगलच घेरण्याचा प्रयत्न केला आहे.15 सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी वक्तव्य केलं होतं. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महसूलमंत्र्यांना धारेवर धरलं. चंद्रकांत पाटील हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल वडेट्टीवारींनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.