विधानसभेआधीच काँग्रेसला धक्का, 'हा' मंत्री'पुत्र' हाती घेणार शिवसेनेचा झेंडा

विधानसभेआधीच काँग्रेसला धक्का, 'हा' मंत्री'पुत्र' हाती घेणार शिवसेनेचा झेंडा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक मातब्बर नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतं.

  • Share this:

मुंबई, 22 जून : लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अनेक मातब्बर नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतं. लोकसभा निवडणुकीतही असंच चित्र होतं. तर राष्ट्रवादीच्या जयदत्त क्षिरसागर यांच्यानंतर नागपूर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेत प्रवेश करणार असल्य़ाचं सांगण्यात येत आहे.

रविवारी दुपारी 4 वाजता दुष्यंत चतुर्वेदी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दुशांतच्या या शिवसेना प्रवेशावर सध्या चांगलंच राजकारण तापलं आहे. दुष्यंत चतुर्वेदी हे नागपूर विद्यापीठचे सिनेट सदस्य आहेत.

दुष्यंत चतुर्वेदी नागपूर येथील लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा संचालकदेखील आहेत. लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्थेचे नागपूर आणि मुंबईत मिळून एकूण 28 शाळा महाविद्यालये असून यात 2 हजार शिक्षक कार्यरत आहेत. तर 20 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी यात शिक्षण घेत आहेत.

विदर्भातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शहर काँग्रेसने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितलं होतं. मात्र, चतुर्वेदी यांनी मुदत संपूनही स्पष्टीकरण दिलं नाही. त्यामुळं काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आपला अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

सतीश चतुर्वेदींविरुध्दच्या अहवालात नेमकं काय होतं?

1)महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वाद निर्माण करणे

2)काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे

3)उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार करणे

4)बऱ्याच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका.

हेही वाचा : सत्ता आल्यास मुख्यमंत्री कुणाचा? भाजपच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी दिलं उत्तर

काँग्रेसचा राजीनामा दिलेले आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा खासदार सुजय विखे पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता सध्या ते अहमदनगरमधून भाजपचे खासदार आहेत.  त्याचबरोबर लोकसभा निवडणुकांच्या आधी राष्ट्रवादीला धक्का देत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी जयदत्त क्षीरसागर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता.

शिवसेना भवनात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जयदत्त क्षीरसागर यांनी अधिकृत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी जयदत्त क्षीरसागर यांना शिवबंधन बांधून त्यांचं स्वागत केलं होतं. यावेळी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.

प्रियांका चतुर्वेदी यांनीही काँग्रेसला जय महाराष्ट्र करून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर एका ट्वीटचा आधार घेत हल्लाबोलही करण्यात आला होता. प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं की, मला कल्पना आहे लोक प्रश्न विचारतील. माझ्या निर्णयाने अनेकजण नाराजही होतील. पण हा निर्णय खूप विचार करून घेतला आहे.

पाकिस्तानी कर्णधाराचा चाहत्यांकडून अपमान, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2019 05:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading