लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. त्या आपल्या नियोजित वेळीच होतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर 7 मार्च : लोकसभा निवडणुकीसह आता विधानसभेच्या निवडणुका देखील एकत्र होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली आहे. लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. त्या आपल्या नियोजित वेळीच होतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या शक्यतांना विराम लागला आहे.

या आधी दोनही निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शुक्रवारी विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या वादाचं निमित्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्यास त्याचा फायदा शिवसेना - भाजप युतीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही असतील.

दरम्यान, शिवसेना - भाजपनं लोकसभा आणि विधानसभेसाठी युती केली असून लोकसभेच्या 25 जागांवर भाजप तर 23 जागांवर शिवसेना लढणार आहे. विधानसभेसाठी देखील 50 -50चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, यापूर्वी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी माहिती दिली होती. पण, आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे.

लोकसभेनंतर भाजप साथ सोडण्याची सेनेली भीती?

सध्याचं देशातील वातावरण हे भाजपसाठी पोषक आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्यास भाजप शिवसेनेशी झालेली युती भाजप तोडेल अशी भीती सेनेला आहे. त्यामुळे शिवसेना देखील दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी सहमती दर्शवेल अशी प्रतिक्रिया संदीप प्रधान यांनी दिली आहे.

First published: March 7, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading