टॉयलेटच्या पाण्यातून तयार करत होता पाणीपुरी, कोल्हापुरातील धक्कादायक घटनेचा VIDEO VIRAL

टॉयलेटच्या पाण्यातून तयार करत होता पाणीपुरी, कोल्हापुरातील धक्कादायक घटनेचा VIDEO VIRAL

टॉयलेटचं पाणी पाणीपुरीसाठी वापरणारा विक्रेता रंगेहात सापडला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 7 नोव्हेंबर : पाणीपुरी बनवण्यासाठी टॉयलेटच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये उघड झाला आहे. स्थानिक लोकांनी याबाबतचं वास्तव समोर आणल्यानंतर पाणीपुरी शौकिनांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॉयलेटचं पाणी पाणीपुरीसाठी वापरणारा विक्रेता रंगेहात सापडला आहे. सदर विक्रेत्याची पाणीपुरी परिसरात चांगली लोकप्रिय असल्याचीही माहिती आहे. मात्र याबाबतचं वास्तव समोर आल्यानंतर लोकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईची स्पेशल पाणीपुरी...या नावाने एक तरुण कोल्हापूरमध्ये पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होता. मात्र या पाणीपुरीसाठी तो चक्क जवळच असलेल्या एका टॉयलेटच्या पाण्याचा वापर करत असल्याचं आता समोर आलं आहे.

पाणीपुरी विक्रेता करत असलेल्या या कृत्याची कल्पना एका सजग नागरिकाला आली. त्यानंतर त्याने या विक्रेत्याचा भांडाफोड करण्याचं ठरवलं आणि हे सगळं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.

याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे लोक चवीनं ही पाणीपुरी खात होते, त्या लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इतके दिवस हा पाणीपुरी विक्रेता आमच्या जीवाशी खेळत होता. त्याच्यावर कारवाई व्हायला हवी, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 7, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या