उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा 'प्रताप'; मद्यपान करत घेतली शासकीय नोंद, VIDEO व्हायरल

उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचा 'प्रताप'; मद्यपान करत घेतली शासकीय नोंद, VIDEO व्हायरल

  • Share this:

जळगाव, 27 जून: उत्पादन शुल्क विभागाच्या एका अधिकाऱ्या 'प्रताप' समोर आला आहे. एका दारू दुकानाचं दप्तर तपासणी करताना अधिकाऱ्यानं चक्क चिल्ड बिअर सेवन करत आणि चखणा खात शासकीय नोंद घेतली.

दारूचे सेवन करत दारू साठ्याची नोंदणी करतानाचा अधिकाऱ्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा..कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही; शरद पवारांचा मोठा खुलासा

व्हिडिओत दिसणारा अधिकारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक नरेंद्र दहिफळे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नरेंद्र दहिफळे चक्क बिअरचे घोट घेत, चखणा खात तसेच दुकानातील मद्यसाठ्याची नोंद घेताना व्हिडीओत दिसत आहे. या प्रकारामुळे कुंपणाच शेत खातं असून उत्पादन शुल्क विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाचं पितळ उघडं पाडणारा हा व्हिडीओ जळगावातील एका दारू दुकानात चित्रित करण्यात आला आहे

व्हायरल व्हिडीओबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संताप व्यक्त केला आहे. ही बाब गंभीर असून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्र्यांकडे करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी दिली आहे.

दारूच्या दुकानांची तपासणी करणे हा उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा अधिकार आहे. मात्र, या अधिकाऱ्यानं तिथे जाऊन मद्यसेवन प्रशासनाचं धिंडवडे काढण्याचं काम केलं आहे. अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया ही पालकमंत्र्यांनी दिली आहे.

हेही वाचा...कोरोनाचा कहर! कंटेन्मेंट झोनमध्ये आता 'कडक लॉकडाऊन', प्रशासनाचा निर्णय

उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी अधीक्षकांनी याप्रकरणी लक्ष घालून असले प्रकार परत घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अधिक्षकांचीही तक्रार मी उत्पादन शुल्क मंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

First published: June 27, 2020, 7:14 PM IST

ताज्या बातम्या