Home /News /maharashtra /

चल, पोलीस चौकीला मीही सांगतो, 12वीच्या विद्यार्थ्याने पकडली कंडक्टरची कॉलर; VIDEO व्हायरल

चल, पोलीस चौकीला मीही सांगतो, 12वीच्या विद्यार्थ्याने पकडली कंडक्टरची कॉलर; VIDEO व्हायरल

मागील शनिवारी आळंदी ते स्वारगेट बसमध्ये हा प्रकार घडला होता

    चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 03 मार्च : राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून समजल्या जाणाऱ्या पुण्यात काय उणे घडले याचा नेम नाही. एकीकडे शिक्षणाचं माहेर घरं नावलौकिक असलेल्या पुण्यात एका विद्यार्थ्याचा प्रताप कॅमेऱ्यात कैद झाला. धावत्या पीएमटी बसमध्ये 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वाहकाला धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मागील शनिवारी आळंदी ते स्वारगेट बसमध्ये हा प्रकार घडला होता. पीएमटी बसमध्ये चालकाच्या बाजूने येण्यास मनाई असते. मागील दाराने बसमध्ये प्रवेश करण्याचा नियम आहे. परंतु, हा मुलगा बसच्या समोरच्या दारातून चढला. वाहकाने त्याला हटकले असता तो त्यांच्याशीच वाद घालायला लागला. हा वाद इतक विकोपाला गेला की, त्याने थेट वाहकाची कॉलर पकडून धरली आणि शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी बसमधील प्रवाशांनी या मुलांची समजूत काढली पण त्याने त्यांचं काही ऐकलं नाही. अखेर चालकाने पोलीस स्टेशनला बस नेण्याचा निर्णय घेतला. तरीही या मुलाने वाहकाची कॉलर धरून ठेवत बसमध्ये राडा घातला. अखेर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलावण्यात आलं. घडलेल्या प्रकाराबद्दल त्याच्या नातेवाईकांनी पीएमटीच्या वाहक आणि चालकाची माफी मागितली. या मुलाची 12 वीची परीक्षा सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याची समजूत काढून सोडून दिलं.  परंतु, पुण्यातील पीएमटी बस मधला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानं पाण्याच्या शोधात अनेक प्राणी-पक्षी भटकताना दिसतात. मुंबईत असंच एक दृश्य पाहायला मिळालं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणारी माकडीण एका इमारतीच्या गच्चीवर दिसून आली आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरामध्ये प्रत्येकजण आपली कामं करण्यात व्यस्त असतो. अशावेळी सिमेंटच्या जंगलात प्राणी पाहायला मिळणं अवघडच. त्यातही माकड आपल्या हातानं पाणी पित असल्याचं पाहायला मिळणं फार दुर्मीळ आहे. भर उन्हात पाण्याच्या शोधात ही माकडीण वणवण भटकत होती. तिला इमारतीच्या गच्चीत पाणी सुरू असल्याचा सुगावा लागला आणि ती त्या गच्चीपर्यंत पोहोचली. तिथे छोट्या पाईपमधून पाणी वाहात असल्याचं पाहाताच तिला आनंद झाला. तिने सुरुवातील पाईपला तोंड लावण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला नीट पाणी पिता येईना शिवाय सिमेंट गरम असल्यानं तोंडही भाजत होतं माग तिने पाईप तोंडाला लावून पाणी पिण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही माकडीण कशा पद्धतीनं पाणी पित आहे हे आपण पाहू शकता. सतत धावणाऱ्या मुंबईकरांचं या व्हिडीओनं मात्र लक्ष वेधून घेतलं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Pune, Pune breaking, Pune news, Viral video.

    पुढील बातम्या