Home /News /maharashtra /

कोल्हापूरकरांचा नादखुळा, भल्या मोठ्या मगरीला असं काढलं विहिरीतून बाहेर, पाहा हा VIDEO

कोल्हापूरकरांचा नादखुळा, भल्या मोठ्या मगरीला असं काढलं विहिरीतून बाहेर, पाहा हा VIDEO

गडहिंग्लज तालुक्यातील दुगूनवाडी गावातील एका विहिरीमध्ये तब्बल दहा फुटांची मगर पकडण्यात वन विभागाला यश आलंय.

कोल्हापूर, 04 मार्च :  कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातील दुगूनवाडी गावातील एका विहिरीमध्ये तब्बल दहा फुटांची मगर पकडण्यात वन विभागाला यश आलंय. दुगूनवाडी या गावातील आप्पा पाटील यांच्या शेतातील विहिरीत गेल्या तीन ते चार दिवसांपासून मगरीचं वास्तव्य होतं. हिरण्यकेशी नदीमधून ही मगर आली असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. त्यानंतर ही माहिती वन विभागाला दिल्यावर मंगळवारी दिवसभर या विहिरीतील पाणी आटवण्यात आलं होतं. आज सकाळपासून वन विभागाकडून इथल्या विहिरीत मगरीला पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती आणि तब्बल पाच ते सहा तासानंतर दहा फूट लांबीच्या पूर्ण वाढ झालेल्या मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आलं. त्यानंतर ही मगर सुखरूप स्थळी सोडण्यात आली आहे. स्कुटी घेऊन तरुणी थेट मंदिराच्या गाभाऱ्यात! दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणीचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती दुचाकीसह मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या महादेवाच्या  मंदिरात मंगळवारी घडलेली ही घटना असल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर ही  क्लिप अनेकांसाठी मनोरंजनाचा भाग ठरतेय आणि 'तरुणीने घेतलं  देवाचं अनोख दर्शन' असं म्हणून खिल्ली उडवत आहे. मात्र, अचानक घडलेल्या या अपघातात ही तरुणी थोडक्यात बचावली आहे. तेव्हा गंमतीचा भाग सोडा आणि आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवा हेच या घटनेतून अधोरेखित होतेय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crocodile, Kolhapur, Kolhapur news

पुढील बातम्या