मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : ...आणि भरसभेत कार्यकर्त्याने दिला पंकजा मुंडेंनाच इशारा

VIDEO : ...आणि भरसभेत कार्यकर्त्याने दिला पंकजा मुंडेंनाच इशारा

यावेळी पंकजा आणि प्रितम या दोन्ही मुंडे भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी पंकजा आणि प्रितम या दोन्ही मुंडे भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी पंकजा आणि प्रितम या दोन्ही मुंडे भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 01 फेब्रुवारी : 'पंकजाताई साहेब, माळी समाजाला काय दिलं?' जर काहीच देणार नसाल तर सरकार पाडू, असा इशाराच एका कार्यकर्त्याने भरसभेत महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिला होता. जाहीर सभेत बोललेल्या कार्यकर्त्याला पंकजा मुंडे यांनीही आपल्या भाषणातून चांगलेच खडसावले.

सावत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी भाजपला मदत केली. पण, गेल्या चार वर्षांत त्यांना काहीही मिळाले नाही. तेव्हा कल्याण आखाडेंनी सांगितले तर हे सरकार पाडू, अशी बंडाची भाषा सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव काळे यांनी केली होती. यावेळी पंकजा आणि प्रितम या दोन्ही मुंडे भगिनी व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीतच काळे यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

महाराष्ट्रातला माळी समाज 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपच्या पाठीशी उभा राहिला. पण, या साडेचार वर्षात माळी समाजाला आणि सावता परिषदेला काय दिले, असा प्रश्न राजीव काळे यांनी पंकजा मुंडेंना भर सभेत विचारला. बीड जिल्ह्यातील दोन मतदारसंघात माळी समाजाचे मतदान निर्णायक आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला गृहीत धरू नये, असा उघड इशाराच काळे यांनी यावेळी दिला. एवढंच नाहीतर न्याय मिळत नसेल तर वेगळी वाट निवडा, असं आवाहनच काळे यांनी भर सभेत केलं होतं.

त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात या कार्यकर्त्याला खडेबोल सुनावले. 'जिल्हास्तरावरच्या कार्यकर्त्याने राज्यातील सरकार पाडण्याची भाषा करायची नसते. मी कधीही सावता परिषदेच्या कल्याण आखाडे यांना डावललेलं नाही. येणाऱ्या काळात सबंध महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने भाषण करताना आपले भान ठेवावे', असं त्या म्हणाल्या.

तसंच 'कार्यकर्त्यांनी सरकार पाडायची भाषा करू नये, शिजेपर्यंत वाट पाहिली निवेपर्यंत पण पहा, नाहीतर हाताने धोंडा पाडून घेवू नका, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी या कार्यकर्त्याला समज दिला.

======================

First published:

Tags: Beed, Pankaja munde, Sawata mali sabha, पंकजा मुंडे, बीड