VIDEO : आत्महत्येचं फेसबुक LIVE, तरुणीने प्यायलं 'गुड नाईट' लिक्विड!

VIDEO : आत्महत्येचं फेसबुक LIVE, तरुणीने प्यायलं 'गुड नाईट' लिक्विड!

हा प्रकार रात्री फेसबुकवर सुमारे साडेचारशे लोकं पाहात होते.

  • Share this:

नितीन बनसोडे, प्रतिनिधी

लातूर, 07 जानेवारी : फेसबुक लाईव्ह करत लातूर शहरातल्या औसा रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीनं  'गुड़ नाईट'चे लिक्विड  पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या तरुणीने  रात्री दोनच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओ करून 'गुड़ नाईट'मधील लिक्विड प्यायलं असून आत्महत्या करत असल्याचं ती सांगत होती.

हा प्रकार रात्री फेसबुकवर सुमारे साडेचारशे लोकं पाहात होते. लाईव्ह पाहणाऱ्या काही लोकांनी आणि पत्रकारांनी  पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. ही माहिती कळताच, पोलिसांनी त्या तरुणीचे घर गाठले आणि तिला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिची परिस्थिती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. ही बातमी पसरताच फेसबुकवरुन तिच्या आत्महत्येचा व्हिडिओ हटवण्यात आला आहे.

=======================

First published: January 7, 2019, 5:45 PM IST

ताज्या बातम्या