Home /News /maharashtra /

आधी रिक्षाला धडक नंतर कठडा तोडून बस विहिरीत, अपघाताचा पहिली VIDEO

आधी रिक्षाला धडक नंतर कठडा तोडून बस विहिरीत, अपघाताचा पहिली VIDEO

नाशिकजवळील कळवण इथं एसटी बस आणि अॅपे रिक्षाचा भीषण अपघात झाला.

    कळवण, 28 जानेवारी : नाशिकजवळील कळवण इथं एसटी बस आणि अॅपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. बसने रिक्षाला धडक दिल्यानंतर  थेट विहिरीत कोसळल्याची घडली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 19 जण जखमी झाले आहे. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे.  घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. कळवण डेपोची एसटी महामंडळाची उमराणे-देवळा बस मालेगाव येथून धोबीघाट मेशीकडे जात होती. धोबीघाटजवळील देश-विदेश हॉटेलजवळ बस पोहोचली असता अचानक टायर फुटले. त्यानंतर बस चालकाने बसवरील नियंत्रण सुटले. बसने एका अॅपे रिक्षाला धडक दिली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या परिसरात वळली. त्यावेळी बस थेट विहिरीच्या कठड्याला धडकली. मात्र, बसचा वेग जास्त असल्यामुळे कठडा तोडून अख्खी बस विहिरीत कोसळली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर बस रिक्षासह विहिरीत कोसळली.  बसमधील 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 19 जण जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्य सुरू आहे. बसची मागील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढलं जात आहे. या घटनेत कुणी दगावला का या बाबत अजून माहिती मिळाली नाही. बचाव कार्य सुरू असून लवकरच सविस्तर माहिती समोर येईल. एसटी बस मधून काही प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे.  जखमी झालेल्या काही प्रवाशांना मालेगाव  देवळा तर काहींना उमराणे येथे शासकीय रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik, St bus, St bus accident

    पुढील बातम्या