VIDEO : वसईतील अभयारण्यात सापांची प्रणयक्रीडा

VIDEO : वसईतील अभयारण्यात सापांची प्रणयक्रीडा

तुंगारेश्वर अभयारण्यात शांतता पसरली आहे. अशातच या अभयारण्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे.

  • Share this:

वसई, 7 जुलै : वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यात पर्यटकांना आणि भाविकांना बंदी करण्यात आली आहे. सध्या अभयारण्यात शांतता पसरली आहे. अशातच या अभयारण्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे.

तुंगारेश्वर अभयारण्यात पसरलेल्या शांततेत सापांची प्रणयक्रीडा तब्बल एक तास सुरू होती. पावसाळा हा सापांना प्रणय क्रीडा करण्यासाठी अत्यंत चांगला मानला जातो. पावसाळ्यात मोकळ्या जागी येऊन साप प्रणयक्रीडा करतात, असं जाणकारांचं मत आहे. तुंगारेश्वर अभयारण्यात नाग आणि नागिणीचा जोडप प्रणय क्रीडा करताना कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

तुंगारेश्वर अभयारण्यात श्री देव महादेवाच्या मंदिराजवळ सापांची प्रणयक्रिडा सुरू होती. दरवर्षी उन्हाळ्याच्या प्रतीक्षेनंतर सर्वजण पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे सापांच्या प्रजाती गरमीने बेहाल होऊन पाऊस कधी पडेल याची वाट पाहतात. हे साप पावसाळा सुरू होताच मोकळ्या जागेत थंडीचा अनुभव घेण्यासाठी म्हणून बिळातून बाहेर पडतात आणि प्रणय क्रीडा करतात.

वसई विरार शहरात सापडलेले अनेक सापांना या तुंगारेश्वरच्या अरण्यात सोडण्यात येतात. त्यामुळे येथील सापांची संख्या वाढत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: July 7, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या