चिपळून, 20 ऑगस्ट : कोयना विद्युत प्रकल्प बाधितांच चिपळूणमधील आंदोलन चिघळलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. प्रकल्प बाधितांना नोकरी मिळाली या मागणीसाठी मागील 6 दिवसांपासून पोफळी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा 6 जणांना फटका बसला आहे.
एकाची प्रकृती नाजूक असून त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आलं आहे. ICU मध्ये दाखल केलेल्या उपोषणकर्त्याने मात्र उपचार घेण्यास नकार दिला आहे. जगूनही आम्ही मेलेल्याच अवस्थेत आहोत, असं म्हणत उपोषणकर्त्या युवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साद घातली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याच्या निर्णयावर प्रकल्पग्रस्त ठाम असल्याचं दिसून येत आहे.
बातमी अपडेट होत आहे...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chiplun