मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रत्नागिरीनंतर चिपळूणमध्ये अग्नितांडव, खेर्डी MIDC मध्ये भीषण आग, VIDEO

रत्नागिरीनंतर चिपळूणमध्ये अग्नितांडव, खेर्डी MIDC मध्ये भीषण आग, VIDEO

खेर्डी एमआयडीसी (MIDC) मधील 3M पेपर मिल परिसरात ही घटना घडली आहे.

खेर्डी एमआयडीसी (MIDC) मधील 3M पेपर मिल परिसरात ही घटना घडली आहे.

खेर्डी एमआयडीसी (MIDC) मधील 3M पेपर मिल परिसरात ही घटना घडली आहे.

चिपळूण, 18 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri) लोटे औद्योगिक वसाहतीत आगीची घटना ताजी असतानाच  चिपळूणमधील (Chiplun) खेर्डी एमआयडीसी (MIDC) मध्ये पेपर मिलच्या वेस्टेज मटेरियलला भीषण आग लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खेर्डी एमआयडीसी (MIDC)  मधील 3M पेपर मिल परिसरात ही घटना घडली आहे. कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कागदाचा लगदा ठेवण्यात आला होता. अचानक या लगद्याने पेट घेतला. बघताबघता या आगीने रौद्ररुपधारण केले. आग आणि धुरीने संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे.

आगीची माहिती मिळताच घटनास्थळावर दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. कागदाचा लगदा असल्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली आहे. आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही.

रत्नागिरीत केमिकल कंपनीच्या आगीत 3 जणांचा मृत्यू

तर, रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहती (Lote MIDC)मधील प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत (Shree Samarth Engineering Chemical Company) रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागली. ही आग इतकी भीषण होती की, त्यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्यांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या रुग्णांना अधिक उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे.

अन् वरुण धवननं त्या लहान मुलीला गंडवलं; Video पाहून हसून हसून व्हाल वेडे

रविवारी (18 एप्रिल 2021) रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तब्ब्ल अडीच तास कंपनीत स्फोट होत होते भीषण लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या. सोबतच पाच पाण्याचे टँकरही पोहोचले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या अपघातात तीन कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले.

First published:

Tags: Chiplun