• होम
  • व्हिडिओ
  • सुप्रिया सुळे यांनी दारात उभं राहून केलं सर्व नव्या आमदारांचं स्वागत; रोहित आणि आदित्यचं कौतुक तर अजित पवारांची घेतली गळाभेट
  • सुप्रिया सुळे यांनी दारात उभं राहून केलं सर्व नव्या आमदारांचं स्वागत; रोहित आणि आदित्यचं कौतुक तर अजित पवारांची घेतली गळाभेट

    News18 Lokmat | Published On: Nov 27, 2019 08:58 AM IST | Updated On: Nov 27, 2019 08:58 AM IST

    मुंबई, 27 नोव्हेंबर : एखाद्या लग्नात यजमान स्वागत करतात त्या थाटात नवनिर्वाचित आमदारांच्या स्वागताला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे विधानभवनाच्या दारात उभ्या होत्या. त्यांनी सर्व आमदारांचं स्वागत हसतमुखाने केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हात हातात घेऊन शुभेच्छा दिल्या. रोहित पवार आणि आदित्य ठाकरे या युवा आणि प्रथमच निवडून आलेल्या नव्या पिढीतल्या आमदारांचं सुप्रिया सुळे यांनी मिठी मारून जोरदार स्वागत केलं. अजित पवार विधान भवनात आले तेव्हाही सुप्रिया सुळे यांनी आनंदाने गळाभेट घेत त्यांचं स्वागत केलं. अजित पवार मात्र पत्रकारांशी फार काही न बोलताच विधान भवनात निघून गेले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading