Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री शिंदेंच्या 'होममिनिस्टर'चा फुल टू जल्लोष, ड्रम वाजवताना VIDEO व्हायरल

मुख्यमंत्री शिंदेंच्या 'होममिनिस्टर'चा फुल टू जल्लोष, ड्रम वाजवताना VIDEO व्हायरल

 मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबीय भावुक झाले होते.

मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबीय भावुक झाले होते.

मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबीय भावुक झाले होते.

मुंबई, ०५ जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मोठा राजकीय संघर्ष करत सरकार आणून दाखवले आहे. मागील १५ दिवसांच्या घडामोडीनंतर मुख्यमंत्री शिंदे सोमवारी घरी पोहोचले. त्यावेळी शिंदे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे (lata shinde) आणि कुटुंबीयांनी स्वागत केलं. विशेष म्हणजे, यावेळी लता शिंदे यांचा ड्रम वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक दिवसांनी आपल्या स्वगृही परतले. यावेळी शिंदे समर्थकांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, त्यामुळे यावेळी कुटुंबीय भावुक झाले होते. पण, घरातून बाहेर गेले शिंदे आज थेट मुख्यमंत्री म्हणूनच घरी परतल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा आनंद गगनात मावत नव्हता. ढोल ताशाच्या गजरात समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लता शिंदे यांनी ड्रम सेटवर ताबा घेतला आणि चांगलाच ठेका धरला. आधी त्यांनी आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमाला भेट दिली आणि त्यांना अभिवान केलं. आनंद दिघे यांच्या नेतृत्वातून मी तयार झाल्याचं एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात. आज मुंबई आणि ठाणे परिसरात तुफान पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीतही त्यांनी आधी चैत्यभूमीला भेट दिली. त्यानंतर शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीवर जाऊन आशीर्वाद घेतलं. यानंतर ते ठाण्याला आले. येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केलं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कोणत्याही महागड्या गाडीत नव्हते. तर बसमधून आमदारांसोबत या सर्व ठिकाणी फिरत होते. त्यांचा साधेपणा त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होता. पावसात भिजत त्यांनी या ठिकाणी भेट घेतली.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या