धावत्या बसमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे अश्लिल चाळे, व्हिडिओ व्हायरल

धावत्या बसमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचे अश्लिल चाळे, व्हिडिओ व्हायरल

. रवींद्र बावनथडे असं त्याचं नाव असून, तो भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे.

  • Share this:

गडचिरोली, 4 जुलै : धावत्या बसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्या भाजप नेत्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलीय. रवींद्र बावनथडे असं त्याचं नाव असून, तो भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे.

व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये संबंधीत आरोपी एका तरुणीशी धावत्या बसमध्ये अश्लील चाळे करताना स्पष्ट दिसतोय. आरोपी बावनथडेने नोकरी आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, संबंधित तरुणीने केलाय. याप्रकरणी चंद्रपुरातील नागभिड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी रवींद्र बावनथडे आणि तक्रारदार तरुणी 27 जूनला नागपूरवरुन नागभिडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होती. या बसमध्येच त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येतंय. ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असून हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच संबंधित तरुणीने पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.

पन्नास वर्षीय रवींद्र बावनथडे हा भारतीय जनता पक्षाचा जुना कार्यकर्ता असून, सध्या तो भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणूनही तो कार्यरत आहे. बावनथडे हा आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक होता. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच भाजपने रवींद्र बावनथडेचा पक्षाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2017 04:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading