मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : प्रेम करायचं तर ओपन करा, झुडपात काय? कोल्हापुरात हिंदू प्रतिष्ठानची प्रेमी युगुलांना दमबाजी

VIDEO : प्रेम करायचं तर ओपन करा, झुडपात काय? कोल्हापुरात हिंदू प्रतिष्ठानची प्रेमी युगुलांना दमबाजी

हिंदू  युवा प्रतिष्ठानने प्रबोधनाच्या नावाखाली प्रेमयुगुलांना दमदाटी करत असल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.

हिंदू युवा प्रतिष्ठानने प्रबोधनाच्या नावाखाली प्रेमयुगुलांना दमदाटी करत असल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.

हिंदू युवा प्रतिष्ठानने प्रबोधनाच्या नावाखाली प्रेमयुगुलांना दमदाटी करत असल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे.

कोल्हापूर, 10 फेब्रुवारी :  हिंगणघाटच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. पीडितेच्या करूण अंतामुळे महाराष्ट्र आज सुन्न झाला होता. परंतु, या प्रकरणी हिंदू  युवा प्रतिष्ठानने प्रबोधनाच्या नावाखाली प्रेमयुगुलांना दमदाटी करत असल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरमध्ये हिंदू युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी  हलगी वाजवत रंकाळा तलावाच्या परिसरात मोहिम हाती घेतली आहे.  रंकाळा परिसरातील प्रेमी युगुलांना पकडून हिंदू युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दरडावून सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हिंगणघाट प्रमाणे घटना घडू नये असं सांगत या व्हिडिओमध्ये मुलीला दरडावण्यात आलं आहे. तसंच मुलालाही समज देत असल्याचं कार्यकर्ते व्हिडिओत दिसत आहे. हिंदू युवा प्रतिष्ठानच्या या मोहिमेमुळे रंकाळा परिसरातून प्रेमी युगुलांनी काढता पाय घेतला. टायगर श्रॉफ आवडतो म्हणून लोकलमध्ये स्टंटबाजी, तरुणाला खावी लागली तुरुंगाची हवा बॉलीवूड कलाकारांच्या चाहत्यांचे विविध प्रकार पाहायला मिळतात. कुणी सलमान-शाहरुखच्या घरासमोर त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासंतास उभे राहतात. तर कुणी रणवीरसारखे कपडे घालून त्याला फॉलो करतात. दीपिका-करिनाची हेअरस्टाईल कॉपी केली जाते तर कतरिना-आलियाचा मेकअप. पण या बॉलीवूड कलाकारांसारखं वागणं एखाद्याच्या जीवावर बेतणार ठरलं तर? ही घटना आहे मुंबईतील. सीएसएमटीवरुन गोरेगावला जाणारी लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. किंग सर्कल स्थानकातून दीपक चव्हाण या स्टंटबाज तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणाची कहाणी ऐकली तर हसावं की रडावं हेच तुम्हाला कळणार नाही. 8 फेब्रुवारीला ही घटना घडली. किंग सर्कल स्थानकात जीवघेणार स्टंट करणाऱ्या या तरुणाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांनी केलेल्या चौकशीमध्ये एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. दीपक टायगर श्रॉफचा (Tiger Shroff) चाहता आहे. टायगर ज्याप्रमाणे सिनेंमांमध्ये स्टंट करतो त्याचप्रकारे खऱ्या आयुष्यात स्टंट करण्याचा दीपकचा मानस होता. पण या स्टंटबाजीमुळे त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं आहे. एखाद्याचं फॅन असणं वाईट नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगलटच येतो. असंच काहीसं या तरुणाच्या बाबतीत घडलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दीपक चव्हाणला फक्त स्टंटबाजीमुळे नाही तर याआधीही अनेक वेळा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्याला रेल्वे पोलिसांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातून 2 वर्षासाठी तडीपार सुद्धा केलं आहे. तरीही कायद्याचं उल्लंघन करत हा तरुण मोकाट वावरत होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
First published:

पुढील बातम्या