VIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान

VIDEO : गिरीश महाजनांनी स्वीकारलं अजित पवारांचं आव्हान

'पक्षाने जर आदेश दिला तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन'

  • Share this:

राजेश भागवत,प्रतिनिधी

जळगाव, 19 जानेवारी : बारामती जिंकण्याच्या विधानावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा आमनेसामने आले आहे. 'जेव्हा बारामतीची निवडणूक लागेल तेव्हा निश्चित तिथेल नेतृत्त्व मी घेईल आणि बारामती नगरपालिका ही ताब्यात घेईल', असं सांगत गिरीश महाजन यांनी अजित पवारांचे आव्हान स्वीकारले आहे.

गिरीश महाजनांनी मध्यतंरी थेट पवारांची बारामती जिंकण्याची भाषा केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून मग राष्ट्रवादीनेही थेट महाजनांच्या जळगावातच राजकीय परिवर्नताचा विडा उचलला. ' 'बारामती काय आहे ते माहिती नाही आणि चालले बारामती जिंकायला. बारामतीच्या लोकांनी आमच्यावर निस्सीम प्रेम केलं आहे. गेल्या 50 वर्षांपासून बारामतीकर आम्हाला निवडून देत आहेत. पवार साहेबांना 23 वर्षांपासून तर मला 27 वर्षांपासून मला बारामतीतून निवडून दिले जात आहे. असे असताना महाजन सांगतात की, बारामती जिंकून दाखवू. ते एवढं सोपे आहे का? तरीही इच्छा असेल तर जरूर बारामतीत या', असं खुलं आव्हानच अजित पवारांनी दिलं होतं. तेही त्यांच्याच जामनेर मतदारसंघात.

अजित पवार यांच्या आव्हानंतर गिरीश महाजनांनी त्यांना उत्तर दिले. 'पक्षाने जर आदेश दिला तर बारामतीत जाऊन नगरपालिका हमखास ताब्यात घेईन. तिथे आट्याकाट्यावरच आहे. 100 टक्के असं काही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे बारामती जिंकणे अवघड नाही' असं म्हणत महाजनांनी आव्हान स्वीकारले.

जामनेर येथील परिवर्तन सभेत जयंत पाटील यांनी एकनाथ खडसेंवरून फडणवीस सरकारवर निशाणा साधला. 'बाहुबलीने कटप्पाने क्यू मारा है' मुळात त्यांचा गुन्हा काय? असा सवाल मला पडला आहे. त्यामुळेच स्वाभीमानी खडसेंचा स्वाभीमान जागा करण्याचा प्रयत्न करतो' असं म्हणून जयंत पाटील यांनी खडसेंना डिवचलं आहे.

भाजपात गिरीश महाजनांना मुख्यमंत्र्यांचे हनुमान म्हटलं जातात. म्हणूनच आता राष्ट्रवादीने महाजनांची त्यांच्यात जळगावात राजकीय कोंडी करण्याची रणनिती आखली आहे. त्यासाठी प्रसंगी एकनाथ खडसेंनाही सोबत घेण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे.

===============

First published: January 19, 2019, 7:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading