मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जंगलातील थरारक VIDEO : रानकुत्र्याने वाघिणीला दिलं जोरदार आव्हान, मात्र...; जाणून घ्या नेमकं काय घडलं

जंगलातील थरारक VIDEO : रानकुत्र्याने वाघिणीला दिलं जोरदार आव्हान, मात्र...; जाणून घ्या नेमकं काय घडलं

ताडोबाच्या मोहर्ली कोअर परिक्षेत्रातला हा दुर्मिळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताडोबाच्या मोहर्ली कोअर परिक्षेत्रातला हा दुर्मिळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताडोबाच्या मोहर्ली कोअर परिक्षेत्रातला हा दुर्मिळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    हैदर शेख, चंद्रपूर, 7 डिसेंबर : पाणवठ्याजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघिणीला हाकलण्याचे अनेक प्रयत्न करूनही रानकुत्र्याला पाणी पिता आलं नाही. बराचवेळ भुंकल्यावर थकलेली रानकुत्री निघून गेली. ताडोबाच्या मोहर्ली कोअर परिक्षेत्रातला हा दुर्मिळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोहर्लीतील प्रसिद्ध सोनम नावाची वाघीण इथल्या एका पाणवठ्यावर येऊन बसली असतानाच रानकुत्र्यांचा कळप तिथं पाणी पिण्यासाठी आला. पण तिथं आधीच साक्षात वाघीण बसली दिसल्यानं या रानकुत्र्यांची मोठी अडचण झाली. त्यातील एका कुत्र्यानं हिंमत करीत पुढं येऊन वाघिणीला हाकलण्याचे प्रयत्न केले. तेवढ्यात तिथं सोनमचा पूर्ण वाढ झालेला बछडा आला. त्यामुळं या कुत्र्यांची आणखीच अडचण झाली. बराचवेळ हा कुत्रा त्यांच्यावर भुंकत राहिला, पण वाघीण काही उठली नाही. बछडा मात्र तिथून निघून गेला. तसंच काही वेळाने रानकुत्र्यांचा कळपही परत गेला. जंगल भ्रमंती करताना वन्यजीवप्रेमींना चपळ रानकुत्री अभावाने दिसतात. त्यातही त्यांच्या भुंकण्याचे प्रसंग तर विरळ. रानकुत्री वाघावर भारी पडत असल्याचे व्हिडिओ आपण बघितले आहेत, पण इथं थोडं वेगळं चित्र पाहायला मिळालं. हा सगळा नाट्यमय प्रसंग पर्यटकांना मनसोक्त बघता आला. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Chandrapur, चंद्रपूर chandrapur

    पुढील बातम्या