VIDEO : धुळे, जळगाव जिंकल्यानंतर बारामतीबद्दल काय म्हणाले गिरीश महाजन?

VIDEO : धुळे, जळगाव जिंकल्यानंतर बारामतीबद्दल काय म्हणाले गिरीश महाजन?

चांगले नियोजन केले तर कुठल्याही शहरात निवडणूक जिंकणे अवघड नाही. म्हणून ती बारामती जरी असली तरी ते कठीण नाही."

  • Share this:

राजेश भागवत,प्रतिनिधी

जळगाव, 07 जानेवारी : 'पक्षाने जबाबदारी दिल्यास पवारांची बारामतीही जिंकू, असं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. गेल्या पाच-सहा वर्षात चांगले चांगले साफ झाले आहे, मायक्रो मॅनेजमेंट केलं तर काहीच कठीण नाही, असंही महाजन म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते.

जळगावमध्ये लोकसभेसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रवादीने ऑफर दिली आहे, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटलं की, लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. राष्ट्रवादीकडून जरी उमेदवारी दिली असेल, तरीही निकम हेच निवडणूक लढवायची की नाही याबद्दल स्पष्टपणे सांगू शकतात."

बारामतीत संधी मिळाली तर विजय मिळवू शकतो असं तुम्ही म्हटला होता,असा सवाल पत्रकारांनी विचारला असता महाजन म्हणाले की, "आमचे मित्र आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार बाबूजी विश्वनाथ जैन यांनी आपल्या भाषणात ते म्हणाले होते, "तुम्ही एका मागून एक जिल्हे काबीज करत आहात. तुमच्यात अशी कोणती शक्ती आहे?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर मी म्हटलं होतं की, पालघर, जळगाव,धुळे, नाशिक आणि आता नगर असेल तिथे आम्हाला विजय मिळवणे कठीण झाले नाही. चांगले नियोजन केले तर कुठल्याही शहरात निवडणूक जिंकणे अवघड नाही. म्हणून ती बारामती जरी असली तरी ते कठीण नाही."

अजित पवारांचे अस्तित्व कुठे?

"बारामतीत राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, त्यामुळे आजपर्यंत कुणाला तिथे विजय मिळवणे शक्य झाले नाही, असा सवाल पत्रकाराने केला असता. यावर महाजन म्हणाले "तसं बघायला गेलं तर जळगाव, नगर, धुळ्यात आमचंही वर्चस्व नव्हतं. गेल्या पाच सहा वर्षात चांगले चांगले वर्चस्व साफ झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आधी कुणाचं अस्तित्व होतं, पुण्यात कुणाचं वर्चस्व होतं. सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. परंतु, राष्ट्रवादीकडे एक सुद्धा महापालिका राहिली नाही. पुणे जिल्हा कुणाचा होता अजित पवारांचाच होता. कुठे काय राहिलं त्यांचं? त्यामुळे बारामतीत आमचं काही नाही, असं म्हणण्याचं कारणच नाही. बारामतीत आमचे उमेदवारही निवडून आले आहे. आमचं कुठेच 25 वरून 0 असं काहीही नाही."

ते पुढे म्हणाले, "बारामतीचे चॅलेंज नाही. पण, चांगलं मायक्रो मॅनेजमेंट केलं तर कुठल्याही शहरात जिंकणे अवघड नाही. बारामती ही पवारांची जरी असली, तरी तिथे नीट कार्यकर्त्यांची फळी लावली तर कठीण काहीच नाही. पक्षाने जर जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवू",असा दावाही त्यांनी केला.

'मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही'

"मुख्यमंत्री होण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्याचा काहीही संबंध नाही. मी जलसंपदा मंत्री म्हणून काम करतोय, त्यात खूश आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आपण आहोत, याचा प्रश्न सुद्धा मनात येत नाही.", असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

=============================

First published: January 7, 2019, 8:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading