Home /News /maharashtra /

ठाण्यात भररस्त्यावर 48 वर्षीय व्यक्तीने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार, VIDEO आला समोर!

ठाण्यात भररस्त्यावर 48 वर्षीय व्यक्तीने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार, VIDEO आला समोर!

चितळसर परिसरात पोहोचल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या शिवाजी कुरणे याने मागून येऊन भरतसिंगवर कोयत्याने सपासप वार केले.

ठाणे, 12 फेब्रुवारी : ठाण्यात भरदिवसा एका ३५ वर्षीय पुरुषावर कोयत्याने सपासप वार करण्याची धक्कादायक घटना घडली. गजबजलेल्या वसंत विहार या परिसरात भररस्त्यात फिल्मीस्टाईल हा थरार बराच काळ सुरू होता.  या प्रकरणी ठाण्यातील चितळसर पोलिसांनी शिवाजी कुरणे या ४८ वर्षीय पुरुषाला अटक केली आहे. आपल्या पत्नीसोबत शेजारी राहणारा ३५ वर्षीय तरुण भरतसिंग राजपूत याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशय शिवाजी कुरणे याला गेल्या अनेक दिवसांपासून होता. याचा राग मनात ठेवून शिवाजी हा भरतसिंग याच्यावर पाळत ठेवून होता. आज सकाळी ११ च्या सुमारास राज पुरोहित कामाला जाण्याकरता घरा बाहेर पडला. वसंत विहारच्या चितळसर परिसरात पोहोचल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या शिवाजी कुरणे याने मागून येऊन भरतसिंगवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनंतर शिवाजी कुरणे याला चितळसर पोलिसांनी अटक केली असून भरतसिंग याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाजी कुरणे याची पत्नी भरतसिंग याच्याकडे स्वयंपाक आणि घरकामाकरता जात होती. हे शिवाजी कुरणेला पसंत नव्हते यावरून शिवाजी आणि त्याच्या पत्नीत वाद देखील झाले. यातून भरत सिंग आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय शिवाजीच्या मनात खोलवर रुतला होता. त्यामुळे आरोपी शिवाजीने अनेकदा भरतसिंग याला फोनवरुन धमकी देखील दिल्या होत्या. पण, आज आरोपीने भररस्त्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी भरतसिंग राजपुरोहित हा एकटाच ठाण्यात राहतो. त्याचे कुटुंबीय मुळगावी राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात वास्तव्याला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे. 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार दरम्यान, पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका होस्टेलमध्ये राहत असताना त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका व्यक्तीने महिलेवर अत्याचार केला. जेव्हा तिने हे आपल्या पतीला सांगितले तेव्हा पतीने दिलेल्या उत्तराने तिला जबरदस्त धक्का बसला. पतीने तिला सांगितले की मीच तुझ्यासोबत त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते. सुरेश शैशराज शिंदे (वय 34, रा.धनकवडी) असे अटक केल्याचे नाव आहे. ही घटना कात्रज परिसरातील एका होस्टेलवर नोव्हेंबर 2019 मध्ये घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला आपल्या पतीसमवेत होस्टेलवर कामाच्या निमित्ताने वास्तव्यास होती. या होस्टेलमधील सुरेश शिंदे याने या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. ही बाब तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा त्याने आपणच सुरेश शिंदे याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे उत्तर दिले. त्यानंतर पीडितेने आपल्या गावी परभणी येथे गुन्हा दाखल केला. परभणी पोलिसांनी पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातीलभारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी सुरेश शिंदे व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन शिंदे याला अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Crime, Mumbai police, Thane, Thane police

पुढील बातम्या