Home /News /maharashtra /

पतंग उडविताना युवकाचा तोल गेला, इमारतीच्या छतावरून पडल्याने मृत्यू

पतंग उडविताना युवकाचा तोल गेला, इमारतीच्या छतावरून पडल्याने मृत्यू

तर दुसऱ्या एका घटनेत एका तरुणीच्या गळ्यात पतंगचा मांजा अडकला. गळा कापल्याने रक्तस्राव सुरू झाला, अचानक घडलेल्या घटनेने ती बेशुद्ध झाली.

    प्रशांत मोहिते, नागपूर 21 जानेवारी : इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय. पतंगाच्या नादात हा पहिला बळी असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या प्रकरणात वाडी परिसरात मांजामुळे एका तरुणीचा गळा कापल्याने अत्यवस्थेत तिला खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. मृताचे नाव सादिक गुलाम नबी शेख वय 35 रा. नागपूर असे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सादिक हा इमारतीच्या छतावर पतंग उडवत होता. अचानक त्याचा तोल जाऊन खाली पडला. मणक्याचे हाड फ्रॅक्चर झाले. शरीराच्या इतरही भागावर गंभीर इजा झाल्या होत्या. त्याच अवस्थेत सायंकाळच्या दरम्यान त्याला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, शिर्डी आणि पाथरीच्या वादाला नवं वळण दुसऱ्या घटनेत नारी रोड येथील रहिवासी श्रद्धा शेंडे वय 24 ही तरुणी परीक्षा देऊन वाडी परिसरातून घरी जात होती. वाटेत तिच्या गळ्यात पतंगचा मांजा अडकला. गळा कापल्याने रक्तस्राव सुरू झाला, अचानक घडलेल्या घटनेने श्रद्धा बेशुद्ध झाली. परिसरातील लोकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी इस्पितळात दाखल केले. तान्हाजी-भाजप व्हिडीओवर खा. संभाजीराजे भडकले, मोदी सरकारला दिला थेट इशारा तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पतंगाच्या मांजाच्या विक्रीवर व वापरण्यावर बंदी आहे. परंतु त्यानंतरही मोठ्या प्रमाणात या मांजाचा वापर झाल्याने दुचाकी वाहन चालकांसोबत पायी चालणारे पण जखमी झाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Kite, Kite festival, Kite flying

    पुढील बातम्या