विधानसभेत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार, मागितल्या एवढ्या जागा

विधानसभेत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार, मागितल्या एवढ्या जागा

आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूचक वक्त्यव्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

  • Share this:

प्रशांत मोहिते, (प्रतिनिधी)

नागपूर, 25 ऑगस्ट- आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूचक वक्त्यव्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. अनेक नेत्यांनी कमळ हातात घेतल्याने तरुण उमेदवारांना संधी मिळण्याला वाव निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने राज्यात 60 जागांची मागणी केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली.

'वेक अप महाराष्ट्र' या युवक काँग्रेसच्या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी नागपूरात आलेल्या सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवक काँग्रेसने 60 जागांची मागणी केली आहे. आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याने युवक काँग्रेसने मागणी केलेल्या जागा कुठल्या हे सांगणे मात्र तांबे यांनी टाळले.

सध्या काँग्रेसमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकरता हा संक्रमणाचा काळ असतानाच काँग्रेसमधील तरुणांसाठी ही संधी असल्याचेही सत्यजीत तांबे यांनी यावेळी सांगितले.

...तर RPI(गवई गट) आघाडीतून बाहेर पडणार

विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. अचलपूर आणि दर्यापूरची जागा दिली नाही तर चर्चा नाही, असा इशारा आरपीआय नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडूंच्या विरोधात निवडणूक लढण्याची इच्छाही राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे.

दर्यापूर आणि अचलपूर या दोन विधानसभेच्या जागा दिल्या नाही, तर आघाडीतून बाहेर पडणार, असा इशारा राजेंद्र गवई यांनी दिला आहे. गवई यांनी आघाडीकडे 10 जागांची मागणी केली आहे. परंतु अचलपूर आणि दर्यापूर या दोन जागांवर तडजोड नाही. या जागा मिळाल्या नाही, तर सर्व जागा लढवू आणि अमरावती जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पाडू, मग आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणू नका, असेही राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.

'वंचित'मध्ये जाण्याची इच्छा...

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जाण्याची इच्छा राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार, असेही ते म्हणाले. वंचित आघाडीने आघाडीसोबत निवडणूक लढवाव्यात, त्यांचे उमेदवार निवडून येतील, असेही ते म्हणाले.

SPECIAL REPORT: राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 12:21 PM IST

ताज्या बातम्या