डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या, त्या 12 लाखाने गूढ वाढलं

त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आलं याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र त्या 12 लाखाचं गुढ कायम आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 03:45 PM IST

डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या, त्या 12 लाखाने गूढ वाढलं

नागपूर 23 ऑगस्ट : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेने मानेवाडा परिसरात खळबळ उडाली. आशिस उसरे असं या तरुणाचं नाव आहे. पिस्तुलाने गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. त्याच्याकडे हे पिस्तूल कुठून आलं याचा तपास पोलीस करत आहेत. आशीष हा नागपूरातील मानेवाडा रोड परिसरात राहतो.

अजनी पोलीस स्टेशन हद्दीतल्या जयवंत नगर गल्लीत ही घटना घडलीय. कामठी परीसरात भीषीचे 12 लाख रुपये घेवून पसार झाल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता, याच आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केलीय. अशी माहिती अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक एच. एल. उरलागोंडावार यांनी दिलीय. त्याच्याजवळ पिस्तूल आलं कुठून याचा पोलीस तपास करतायत.

पीकविम्याचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरेंची मोदी सरकारकडे मागणी

नागपूरात एकाच रात्रीच तीन खून

एकाच रात्री तीन खून झाल्याने महाराष्ट्राची उपराजधानी हादरली आहे. खून झालेल्या व्यक्तींमध्ये प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला यांचा समावेश आहे. नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केडीके कॉलेजजवळ बुधवारी (21 ऑगस्ट) रात्री सैयद इम्रान सय्यद नियाज नामक तरुणाची हत्या करण्यात आली. दुसरी घटना सदर भागातील गोंडवाना चौकात घडली. प्रॉपर्टी डीलर ऋषी खोसला (वय-50) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा खून दिघोरी परिसरातील सेनापतीनगरात झाला आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी विकी विजय दहाट (वय-32) या तरुणाची हत्या केली आहे.

Loading...

'चला फोडुया EVM ची हंडी'; EVM विरोधात मनसेकडून पोस्टरबाजी

आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी भोसकले..

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्रनगर चौकात खरेदी केलेल्या आल्याचे पैसे मागितल्यामुळे गुंडांनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केले. भाजी विक्रेत्याचा सहकारी सैयद इमरान सय्यद नियाज हा बाजूला असलेल्या पानठेल्यावर उभा होता. इमरान हा मदतीसाठी धावला असता त्याच्याही पोटात चाकू भोसकला. रक्ताच्या थारोळ्यात इमरान खाली कोसळला. मारेकरी पसार झाले. परिसरातील नागरिकांनी इमरानला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.

भाजी चिरण्याच्या चाकूने पतीच्या पोटावर केले 11 वार, नंतर गळाही कापला

तरुणीच्या घरात घुसून काढली छेड

नागपुरमध्ये गुंडांचा धुमाकूळ काही शांत होण्याची चिन्हं दिसत नाहीत. विविध गुन्ह्यांनी कायम चर्चेत राहणाऱ्या नागपुरात आणखी एक धक्कादायक घटना पुढे आलीय. दोन गुंडांनी एका तरुणीच्या घरात घुसून तिची छेड काढल्याचं प्रकरण समोर आलंय. रात्री हे दोन गुंड तिच्या घरात शिरले आणि त्यांनी तिचा विनयभंग केला अशी तक्रार पीडित तरुणीने दाखल केलीय. हे दोनही गुन्हेगार पोलिसांच्या हिटलिस्टवर असून पोलिसांचा ते सापडत नाहीत. मात्र, शहरात घुसून राजरोसपणे गुन्हे करतात यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात येतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 03:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...