Elec-widget

गडचिरोलीत तरुणांचा एल्गार, माओवाद्यांना केली गावबंदी

गडचिरोलीत तरुणांचा एल्गार, माओवाद्यांना केली गावबंदी

मावोवादी प्रशासनाला मदत करणाऱ्या तरुणांची हत्या करतात किंवा त्यांना पोलिसांचा खबऱ्या ठरवलं जातं. अशा अनेक तरुणांच्या हत्या माओवाद्यांनी केल्या आहेत.

  • Share this:

महेश तिवारी, गडचिरोली 30 ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा येथील स्फोटात मे महिन्यात माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात पंधरा जवान शहीद झाले होते. या घटनेत पोलिसांनी लेवारी येथील तरुणांना अटक केली होती. आता त्या लेवारी गावच्या नागरिकांनी माओवाद्याच्या विरोधात एल्गार पुकारलाय. तरुणांनी आक्रमक भूमिका घेत माओवाद्यांनी घातपातासाठी  गावातल्या तरुणांचा वापर केल्याचा गंभीर आरोप केलाय. यापुढे त्यांना गावबंदी करण्यात येईल असा इशारा दिलाय.

गेल्या एक मे रोजी कुरखेड्याजवळ माओवाद्यांनी केलेल्या स्फोटात पंधरा जवान शहीद झाले होते या घटनेच्या तपासात लेवारी येथील काही तरुणांना पोलीसानी अटक केली होती. आज या गावच्या नागरीकांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन माओवाद्यांबद्दल रोष व्यक्त केला.

कॉलेजच्या स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

गावातल्या तरुणांची चूक झाली असुन माओवाद्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी या तरुणांचा वापर केल्याचा आरोप केला. यापुढे या गावात माओवाद्यांना कुठलीही मदत मिळणार नसुन त्यांना गावबंदी केली जाईल असं गावकऱ्यांनी पोलिसांसमोर स्पष्ट केलंय.

गडचिरोलीत माओवादी तरुणांना भडकवून त्यांना पोलिसांविरुद्ध लढायला भाग पाडतात. विकासाचा अभावामुळे परिसरात रोजगाराच्या संधी नाहीत त्यामुळं हे तरुण मावाद्यांच्या प्रचाराला बळी पडतात. तर पोलीस अशा तरुणांवर कारवाई करतात. त्यामुळे या संघर्षाचा तरुणांना मोठा फटका बसतोय. एकदा माओवाद्यांच्या कळपात गेल्यानंतर तिथून बाहेर पडणं हे अशक्य असतं.

Loading...

...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

तिथून बाहेर पडलं तर मावोवादी अशा तरुणांची हत्या करतात किंवा त्यांना पोलिसांचा खबऱ्या ठरवलं जातं. अशा अनेक तरुणांच्या हत्या माओवाद्यांनी केल्या आहेत. पोलिसांनी माओवाद्यांसाठी पुनर्वसन योजना तयार केली असून जे तरुण वाट चुकून माओवाद्यांकडे गेले त्यांनी पुन्हा मुख्य प्रवाहात येणं पसंत केलंय. तर माओग्रस्त भागातल्या तरुणांसाठी पोलीस विविध योजना राबवत असून त्यांना भरकटण्यापासून वाचविण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 04:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...