बाईक वेगात का चालवली म्हणून मारहाण, तरुणाचा मृत्यू

बाईक वेगात का चालवली म्हणून मारहाण, तरुणाचा मृत्यू

रात्री आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची बाईक वेगाने चालवली या शुल्लक कारणाने आशिषला 5 तरुणांनी त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली.

  • Share this:

नागपूर 13 ऑगस्ट : नागपुरात क्षुल्लक कारणावरून पुन्हा एकाची हत्या झाल्याची धकाकादायक घटना घडलीय. दुचाकी वेगात चालवल्याच्या कारणाने 5 जणांनी आशिष देशपांडे या तरुणाला जबर मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झालाय. ही घटना शहरातील शांतीनगर भागात घडली. आशिष देशपांडे यांच्या  हत्येप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आलीय.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष शांतिनगर परिसरातला रहिवासी आहे. रात्री आशिष घरी परत येत असताना त्याने त्याची दुचाकी वेगाने चालवली या शुल्लक कारणाने आशिषला 5 तरुणांनी त्याच्या घरी जाऊन जबर मारहाण केली. आरोपींनी आशिषच्या डोक्यावर आणि पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असता आशिषचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी सुरज मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम आणि आदर्श या पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय.

पुरग्रस्तांसाठी सरसावले हजारो हात, 8 दिवसांमध्ये तिजोरीत जमा झाली 'एवढी' रक्कम

मॉल्समधल्या चेंजिंग रुमची पोलीस घेणार झडती

नागपूरातलं सर्वात मोठं मार्केट असलेल्या सीताबर्डीत उघडकीस आलेल्या चेंजिंग रूम प्रकरणाची पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी गंभीर दखल घेतलीय. असे गंभीर गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी आता एक विशेष तपास पथक तयार केलं आहे. हे पथक विविध मॉल, शॉप्स आणि अन्य आस्थापनांना आकस्मिक भेट देऊन तेथील चेंजिंग रूमची झडती घेणार आहे. एका मॉलमधल्या महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल फोन आढळल्याने खळबळ उडाली होती. तरुणींचे अश्लिल व्हिडीओ तयार करण्यात आल्याचंही पोलिसांना आढळून आलं होतं.

पुण्यात गोळीबार, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मृत्यू

प्रत्येक मोठ्या मॉल्समध्ये चेंजिंग रूम्स असणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. कपडे विकत घेतल्यानंतर ते ट्राय करून पाहण्यासाठी या रूम्स वापरल्या जातात. मात्र नागपुरातल्या एका मॉलमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून अश्लिल व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार उघडकीस आलाय. सीताबर्डीतील फ्रेण्डस् या कपड्याच्या दुकानातील महिलांच्या चेंजिंग रूममध्ये हा विकृत प्रकार उघडकीस आला.

जुना फोटो व्हायरल होत असल्याने पंकजा मुंडे भडकल्या

रूममध्ये मोबाईल लपवून कपडे बदलविणाऱ्या युवतीचा अश्लील व्हिडीओ बनविला गेल्याचे त्यातून उघडकीस आलं. सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येऊन दुकानमालक किसन इंदरचंद अग्रवाल तसेच निखील ऊर्फ पिंटू दीपक चौथमल या दोघांना अटक करण्यात आली होती. या आधीही असे गैर प्रकार उघडकीस आल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

First published: August 13, 2019, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading