महाविकास आघाडीचा भाजपला मोठा धक्का, आणखी एक जागा जिंकली

महाविकास आघाडीचा भाजपला मोठा धक्का, आणखी एक जागा जिंकली

या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडे बाजार झाल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • Share this:

भास्कर मेहेरे, यवतमाळ 04 फेब्रुवारी : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला जोरदार धक्का दिलाय. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या सुमित बाजोरिया यांचा पराभव केला. चतुर्वेदी यांना 298 तर भाजपच्या सुमित बाजोरिया यांना 185 मतं मिळाली. तर 6 मतं अवैध झाली.आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवाती पासूनच महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी आघाडीवर होते. मत मोजणी संपली तेव्हा चतुर्वेदी 113 मतांनी विजयी झाले.

या पोटनिवडणुकी साठी 31 जानेवारीला मतदान घेण्यात आलं होतं. यापूर्वी यवतमाळ विधान परिषद मधून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत निवडून आले होते. त्या नंतर ते विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीत 489 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मोठ्या प्रमाणात घोडे बाजार झाल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

'हर हर मोदी'ला, 'घर घर केजरीवालचं' उत्तर! देशाच्या राजकारणात पहिलाच प्रयोग!

तानाजी सावतं हे मराठवाड्यातले असले तरीही ते विदर्भातल्या यवतमाळमधून निवडून आल्याने त्यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. त्याआधीही यवतमाळच्या निवडणुकीवरून राजकारण रंगलं होतं. पैशाच्या जोरावर धनाढ्य बिल्डर आणि कंत्राटदार निवडणुकीत तिकीटं मिळवून निवडून येतात असाही आरोप कायम होत होता.

सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपडला पण त्याच्यावर काळाचा घाला, अपघातात जागीच ठार

भाजपचे उमेदवार बाजोरीया हेही मोठे कंत्राटदार आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली होती. राज्यात सत्ता आल्याने चतुर्वेदी यांना मोठं पाठबळ मिळालं होतं. काँग्रेसचे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे ते पुत्र आहेत.

 

 

First published: February 4, 2020, 11:03 AM IST
Tags: yavatmal

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading